शाहिद भूषण दांडेकर पंचतत्वात विलीन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

भूषण दांडेकर यांनी नऊ वर्ष सैन्यदलात सेवा दिली.  त्यांनी कुपवाडा, राजोरी, बिकानेर आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रायफल या ठिकाणी सेवा दिली.

खरांगणा  : भारतीय सैन्यदलातील १६ मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये कार्यरत जवान भूषण सुनील दांडेकर (वय २९) यांच्या पार्थिवावर मोरांगणा येथे रविवारी (ता. २३) अंत्यसंस्कार करण्यात आले. पुलगाव येथील लष्कराच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली.

मोरांगणा येथील भूषण दांडेकर २०११ मध्ये सैन्यदलात दाखल झाले होते. कर्नाटकातील बेळगाव येथे कर्तव्यावर असताना १३ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा धक्‍का आला. प्रारंभी बेळगाव येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुण्यातील कमांडो रुग्णालयात हलविले. आठ दिवसांच्या उपचारानंतर तिथे त्यांचा मृत्यू झाला.

भूषण दांडेकर यांनी नऊ वर्ष सैन्यदलात सेवा दिली.  त्यांनी कुपवाडा, राजोरी, बिकानेर आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रायफल या ठिकाणी सेवा दिली.

पुण्यावरून निघालेला भूषण दांडेकर यांचा मृतदेह रविवारी गावात पोहोचताच परिसरातील महिला, युवक व नागरिकांनी एकच गर्दी केली. खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, माजी आमदार अमर काळे, बाळा जगतात, जि. प. सदस्य राजश्री राठी, हनुमंत चरडे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विनायक मगर आदींनी अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मराठा बटालियनचे जवान यावेळी उपस्थित होते. लहान भाऊ रोशन याने भूषण दांडेकर यांच्या चितेला मुखाग्नी दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News