मौज-मजेसाठी तरूणांनी चोरल्या तब्बल १२ लाखांच्या बाईक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

हे तरूण हिरो-होंन्डा कंपनीच्या बाईक चोरून ग्रामीण भागात विकणार होते. तसेच पुण्यातील विविध ठिकाणाहून यांनी बाईक चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 

हडपसर - सद्याची तरूणाई अधिक मौज-मजा करताना आपल्याला दिसते, त्यातचं मौज-मजेसाठी पैसे खिशात नसले, की त्यांना नसते उद्योग सुचतात हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. विशेष म्हणजे तीन तरूणांनी स्वत:च्या मौज-मजेसाठी तब्बल १२ लाखांच्या हिरो-होंन्डाच्या बाईक चोरल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरूणांची नावे संजय भोसले, बाबासाहेब डोंगरे आणि अजित कांबळे असून त्यांची हडपसर पोलिस कसून चौकशी करत आहेत. चोरलेल्या एकूण २५ बाईक पुण्यातीलचं आहेत. 

बाईक चोरीची प्रकरणे वारंवार घडत असल्याने पोलिस मागील कित्येक दिवसांपासून तपास करत होते. त्यातचं पुण्यातील मगरपट्टा चौकात पार्किंग स्थळावर काही तरूण रेंगाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्या तिघांनी १२ लाख रूपयांच्या बाईक चोरल्याची कबूली पोलिसांना दिली. 

हे तरूण हिरो-होंन्डा कंपनीच्या बाईक चोरून ग्रामीण भागात विकणार होते. तसेच पुण्यातील विविध ठिकाणाहून यांनी बाईक चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News