'धुरळा' टीम ची मजामस्ती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी व अंकुश चौधरी यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांबद्दल सांगताना प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. या चौघांनी सिनेमातील एका गाण्यावर नृत्य सादर केलं आणि ते नाचतच प्रेक्षकांमध्ये जाऊन पोचले.

झी स्टुडिओ निर्मित ‘धुरळा’ या ३ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी स्टेजवर येत धमाल केली! अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी व अंकुश चौधरी यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांबद्दल सांगताना प्रेक्षकांना मनमुराद हसवलं.

या चौघांनी सिनेमातील एका गाण्यावर नृत्य सादर केलं आणि ते नाचतच प्रेक्षकांमध्ये जाऊन पोचले. तिथं अमृता खानविलकर, दीपाली सय्यद, मानसी नाईक, स्वप्नील जोशी यांनीही या चौघांबरोबर नृत्य सुरू केलं आणि प्रेक्षकांनी या उत्स्फूर्त नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News