मुंबईत 36 महाविद्यालयांची भर; वाचा कोठे? आणि कोणते? महाविद्यायल सरु होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020

बुधवारी (ता. २६) मुंबई विद्यापीठाची वार्षिक अधिसभा संपन्न झाली. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२१- २२ साठी एकूण 36 नवीन महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आले.

मुंबई :  बुधवारी (ता. २६) मुंबई विद्यापीठाची वार्षिक अधिसभा संपन्न झाली. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२१- २२ साठी एकूण 36 नवीन महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आले. तर अधिसभा सदस्यांकडून आठ स्थगन प्रस्ताव आणि 56 प्रश्न उपस्थित करण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने समाधानकारक दिली. अधिष्ठांनी वार्षिक बृहत आराखडा तयार करुन मंजूरीसाठी अधिसभेत मांडला. बृहत आराखड्यात व्यवस्थापन परिषद, विद्या परीषद यांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले. सर्वांनुमते बृहत आराखडा मंजूर करण्यात आला. ही अधिसभा तब्बल 14 तास ऑनलाईन घेण्यात सुरु होती. यावेळी अधिसभेत विविध प्रश्न मार्गी लागले.

दिवसेंदिवस मुंबई विद्यापीठाचा पसारा वाढत आहे. सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी नवीन ३६ महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यात आर्ट, सायन्स, कॉमर्सची १६ महाविद्यालये, कॉमर्स अँड सायन्सची 6 रात्र महाविद्यालय, 3 हॉस्पिटॅलिटी कॉलेज, २ समाजकार्य महाविद्यालय, ३ इंटिग्रेटेड शिक्षण, १ हॉटेल व्यवस्थापन, १ शारीरिक एज्युकेशन, १ क्रीडा महाविद्यालय अशा प्रकारे एकुण 36 महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. ही महाविद्यालये मुंबई विद्यापीठ क्षेत्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहेत.

अर्धवेळ अभियांत्रिकी महाविद्यालय 

प्रतिकुल आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पदवी घेणे शक्य होत नाही, त्यामुळे अभियांत्रिकी डिप्लोमावर नोंकरी स्वीकारावी लागते, नोकरी लागल्यानंतर पदवीचे शिक्षण पुर्ण करण्याची बहुतांश विद्यार्थ्यांची इच्छा असतो, मात्र नोकरीच्या गराड्यातून वेळ मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पार्ट टाईम अभियांत्रिकी पदवी कोर्स सुरु करावा अशी मागणी अधिसभा सदस्य सुप्रसिद्ध वकील वैभव थोरात यांनी कुलगुरुंना केली. लवकरत हा प्रश्न मार्गी लागवला जाईल असे आश्वासन कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी दिले. मंत्रालय, महानगरपालिका, सार्वाजनिक बांधकाम विभाग, अशा विविध विभागामध्ये हजारो डिप्लोमा धारक कर्मचारी आहेत, अर्धवेळ अभियांत्रीकी महाविद्यालय सुरु केल्यास कर्मचाऱ्यांना पदवीचे शिक्षण पुर्ण करता येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News