मैत्री

निकीता मोरे
Friday, 18 September 2020

चहा तसा रोजचाचं, पण टपरीवर मैत्रीणींसोबत घेतलेल्या चहाची गोडी निराळीचं..! त्या वाफाळलेल्या चहाच्या घोटांसोबत चाललेला अर्थहिन संवाद आणि होणारा हास्यस्फोट सारंच मैत्रीत अर्थपूर्ण...! आनंद देणारं, आठवणींच गाठोडं बांधणारं

मैत्री

मैत्री... तसं पहायला गेलं तर केवळ अडीच अक्षरी शब्द... पण, संपुर्ण विश्र्वाला कवेत घेण्याचं सामर्थ्य आहे या शब्दात!

एन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी तर श्र्वास असते मैत्री. प्रेम म्हणजे मैत्री, जिव्हाळा म्हणजे मैत्री, भांडणं करून पुन्हा एकत्र येणं म्हणजे मैत्री, समोरून शिवी जरी आली तरी हसून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे मैत्री...!

चहा तसा रोजचाचं, पण टपरीवर मैत्रीणींसोबत घेतलेल्या चहाची गोडी निराळीचं..! त्या वाफाळलेल्या चहाच्या घोटांसोबत चाललेला अर्थहिन संवाद आणि होणारा हास्यस्फोट सारंच मैत्रीत अर्थपूर्ण...! आनंद देणारं, आठवणींच गाठोडं बांधणारं...

या आणि अशा अनेक क्षणांची पुंजी सोबत घेऊन आयुष्याची वाटचाल करायची असते. आयुष्याच्या या प्रवासात खूप जणांचा पाठिंबा मिळतो, पण सोबत मिळते ती केवळ मैत्रीची, जिवाभावाच्या मैत्रीणींची... आणि मग क्षितीजासमान भासणारं यशाचं शिखर देखील सर होतं.

मित्र-मैत्रिणींच्या सहवासात... अशीच असते 'मैत्री', आनंदात तो द्विगुणित करणारी, संकटात लढायला बळ देणारी आणि तिच्या मिठीत जगाचं दु:ख विसरायला लावणारी...!

- निकीता मोरे

टीवाय बीसीए सायन्स, एच व्ही देसाई महाविद्यालय, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News