फ्रेंन्डशिप डे: पंम्चर दुकाणात काम करणारा तरुण मित्रामुळे झाला आयएएस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020

जीवाभावाचे मित्र आयुष्याला कलाटणी देऊन जातात. पम्चरच्या दुकाणात काम करणारा वरुण मित्रांच्या सहकार्यामुळे आयएएस झाला.

संपूर्ण देशात आज फ्रेंडशिप डे साजरा केला जातोय. 'चुकता पाऊल फिरवणारा आणि जाणारा तोल सांभाळणारा' तोचं खरा मित्र असतो. मित्राची भूमिका प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असते. जीवाभावाचे मित्र आयुष्याला कलाटणी देऊन जातात. पंम्चरच्या दुकाणात काम करणारा वरुण मित्रांच्या सहकार्यामुळे आयएएस झाला. पाहून या वरुणच्या जिद्दीची कहानी.

बोईसार शहरात राहणारा वरूण बरणवाल २०१३ साली यूपीएससीची परीक्षा पास झाला. देशातून ३२ वा रॅंक मिळवून आयएएस पद ग्रहण केले. कुटुंबाता गाडा चालण्यासाठी वरुणचे वडील पंम्चरचे दुकाण चालवत होते.

 दहावीची परीक्षा देऊन वडीलांसोबत काम करण्याचा निश्चय वरुणने केली. २००६ साली वरुणने दहावीची परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर तीन दिवसांनी वडीलांचे निधन झाले त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवण्याची जबाबदारी वरुणवर आली. मात्र आईने पुढील शिक्षण घेण्यासाठी मुलाकडे आग्रह धरला. घराशेजारी चांगले महाविद्यालय होतो. त्या महाविद्यालयांमध्ये वरुणला प्रवेश घ्यायचा होता, मात्र १० हजार रुपये डोनेशन मागितल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकला नाही.

दहावीत गुणवत्ता असूनही पैसे नसल्यामुळे वरूणला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. मात्र वरूणने शिक्षणाची जिद्द सोडली नाही, वडीलांच्या पंम्चर दुकाणात काम करून अकरावी- बारावी परीक्षा दिली. आणि चांगले मार्क मिळवले. 

वरुण पंम्चरच्या दुकाणात काम करत होता, वरूणला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत वरूणचे मित्र धावून आले, युपीएससीची परीक्षा फी मित्रानी भरली. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वरुणने यूपीएससीची पूर्व परीक्षा पास केली.

मुख्य परीक्षेला चार महिने बाकी होते, त्यासाठी पुर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आवश्यक होतो, अशा परिस्थितीत आईने आणि भावाने वरुणला धीर दिला. मुख्य परीक्षेला लागणारी सर्व आर्थिक जबाबदारी आई, भाऊ व मित्रानी स्वीकारली. वरुणने मुख्य परीक्षेची चांगली तयारी केली आणि परीक्षा दिली. वरुणला मुख्य परीक्षेच चांगले गुण मिळाले.

ज्या डॉक्टरांनी वरुणच्या आई- वडीलांनची ट्रिटमेंन्ट केली त्या डॉक्टरांनी वरुनला आर्थिक मदत केली. जेव्हा युपीएससीचा रिझल्ट लागला तेव्हा वरूण ३२ व्या रॅंकने पास झाला आणि आयएएस मिळाले. तेव्हा वरूणने आपले आई, भाऊ, मित्र यांचे आभार मानले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News