मैत्री

रसिका जाधव
Tuesday, 4 August 2020

मैत्री म्हणजे

रखरखत्या उन्हात मायेची सावली

सुखाच्या दवात भिजून

चिंब चिंब नाहली

मैत्री म्हटलं की

आठवतं ते बालपण

आणि मैत्रीतून मिळालेलं

ते खरखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी

कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी

मित्रांची नाव सांगायची नाही

मैत्रीच हे नातं

सगळ्या जगात श्रेष्ठ

हे नात टिकवण्यासाठी

नकोत खूप सारे कष्ट

मैत्री हा धागा

रेशमापेक्षाही मऊ सूत

मैत्रीच्या कुशीतच शमते

मायेची ती सुप्त भूक

मैत्रीच्या सहवासात

श्रम सारे विसरतात येतात

पण खरे मित्र मिळवण्यासाठी

काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे

रखरखत्या उन्हात मायेची सावली

सुखाच्या दवात भिजून

चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे

जुन्हा आठवणींना उजाळा देऊन

गालातल्या गालात हसणारे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News