अभिनव शाळेत ताज्या झाल्या जुन्या आठवणी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

व्हाट्‌सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना संपर्क साधला आणि एकत्र आलो, असे माजी विद्यार्थी अरुण निघोजकर यांनी सांगितले.

कर्जत : कर्जत शहरातील नामवंत असलेल्या अभिनव ज्ञान मंदिर शाळेचे १९७६-७७ च्या एसएसएसी बॅचच्या विद्यार्थ्यांनी ४० वर्षांनंतर कर्जत शहरातील रॉयल कॅम्प येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, देशविदेशात कामानिमित्त स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनीही या स्नेहसंमेलनाला उपस्थिती लावली होती.

गेट टुगेदरचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या अभिनव ज्ञान मंदिर शाळेत शिक्षण घेऊन आम्ही उच्च पदावर पोहोचलो. त्या शाळेचे आपण काही देणं लागतो. त्यामुळे ऋण फेडण्यासाठी काही प्रमाणात शाळेला मदत करायची आहे. या कार्यक्रमाला गुजरात, ठाणे, पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून माजी विद्यार्थी आले होते. व्हाट्‌सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना संपर्क साधला आणि एकत्र आलो, असे माजी विद्यार्थी अरुण निघोजकर यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियावरून आलेले विवेक कुलकर्णी यांनीही आपल्या मनोगतात शालेय आठवणींना उजाळा देत अनेक किस्से सांगितले. तर काहींनी आपल्या आजवरच्या वाटचालीविषयी कथन केले. 

या स्नेहसंमेलनाला गुजरातची ज्योती पटेल, सोलापूरचे अशोक ओसवाल, विकास चित्ते, सीमा गांगल, विजय कुलकर्णी, गिरीश पटेल, अभिन्न शिंदे, संध्या साने, गिरीश पटेल, विनायक वैद्य, पौर्णिमा चौधरी, धनंजय देशमुख आदी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News