सोलापूरात ‘सकाळ माध्यम समूहातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

सोलापूर - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन ‘सकाळ माध्यम समूह’ व संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यातर्फे ‘यशाची गुरुकिल्ली’ या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

यामध्ये डिप्लोमा, बारावी, पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी विशेष कार्यशाळा होणार असून त्यात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व वक्ते करिअर निवडीसंदर्भात मोफत मार्गदर्शन करतील. आत्मविश्‍वास कसा वाढवावा, उच्चशिक्षणातील विविध संधी, कोणते क्षेत्र करिअर म्हणून निवडावे, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे, प्रवेश प्रक्रिया कशी असेल यासाठी काय तयारी करावी, स्वयंप्रोत्साहनाची तंत्रे आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञ वक्‍त्यांकडून प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळणार असून करिअरबाबत येणाऱ्या त्यांच्या शंकाचे निरसनही करण्यात येणार आहे.

संजय घोडावत विद्यापीठातर्फे प्रामुख्याने अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, व्यवस्थापन, कला, विज्ञान, वाणिज्य या विभागांतर्गत अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांची पदवी, पदव्युत्तर व पीएचडी पर्यंत पदवी संपादन करण्याची संधी उपलब्ध आहे. नावीन्याचा व गुणवत्तेचा ध्यास घेत घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता गरजेचा असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच विद्यापीठात कौशल्य शिक्षण मिळावे याकरिता विद्यापीठामध्ये तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांकडून उपक्रमशील प्रयत्न सातत्याने केले जातात. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या विद्यापीठातर्फे समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. दरम्यान, या वेळी बारावीमध्ये ६० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ‘सकाळ माध्यम समूह’ व संजय घोडावत विद्यापीठातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News