दहावी विद्यार्थ्याना मोफत रिक्षाची सेवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

घाटकोपर भटवाडी येथील सिद्धीगणेश शेअर रिक्षा स्टॅंड यांच्या विद्यमाने दहावीच्या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षाची सेवा दिली जात आहे.

घाटकोपर  : घाटकोपर भटवाडी येथील सिद्धीगणेश शेअर रिक्षा स्टॅंड यांच्या विद्यमाने दहावीच्या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षाची सेवा दिली जात आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचायला उशीर होऊ नये, यासाठी हा उपक्रम घेत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. या वेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक बाबा हांडे, अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष मंगेश परब, सरचिटणीस रवींद्र घाग, सामाजिक कार्यकर्ते मोहन वामन व रिक्षा स्टॅंडचे पदाधिकारी व चालक-मालक हे उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News