विदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्या ११ तरुणांची फसणूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020
  • विदेशात नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अशीच स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचा फायदा घेऊन, त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नवी मुंबई येथे घडला आहे.
  • नवी मुंबईतल्या सीवूड येथील व्हीआरव्ही मेरीटाइम प्रा. लि ह्या कंपनीने तामिळनाडू येथील ११ तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून ३४ लाख रुपये ऐटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई :- विदेशात नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अशीच स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचा फायदा घेऊन, त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नवी मुंबई येथे घडला आहे. नवी मुंबईतल्या सीवूड येथील व्हीआरव्ही मेरीटाइम प्रा. लि ह्या कंपनीने  तामिळनाडू येथील ११ तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून ३४ लाख रुपये ऐटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विवेक कुमार आणि रुतु विवेक कुमार या दोघांनी सीवूड येथील एका मॉल मध्ये व्हीआरव्ही मेरीटाइम प्रा. लि यानावाने कंपनी सुरु केली होती, या कंपनीच्या माध्यमातून विदेशात नोकरी लावण्याचे काम केले जात होते. सेथील कुमारन या उल्वेमध्ये  राहणाऱ्या व्यक्तीने २०१८ रोजी विवेक कुमार यांच्या कंपनीकडे विदेशात नोकरी करण्यासाठी अर्ज केला होता. परंतु त्यांचे वय ४० पेक्षा अधिक असल्याने त्यांना नोकरी मिळू शकणार नाही असे सांगण्यात आले. परंतु  तुमच्या परिचयांपैकी कोणी मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले असेल तर त्यांना आम्ही नोकरीची संधी देऊ शकू आणि त्यासाठी तुम्हाला कमिशन म्हणून प्रत्येकी २० हजार रुपये दिले जातील असे सेथील यांना विवेक कुमार यांच्या कंपनीकडून सांगण्यात आले. तामिळनाडू राज्यातील ओळखीच्या ११ तरुणांना सेथील यांनी याकंपनीकडे अर्ज करण्यास सांगितले. प्रत्येक उमेदवाराने विदेशात नोकरी मिळवून द्यायच्या बदल्यात संबंधित कंपनीला ३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम देऊ केली. 

नोकरी करू इच्छिणाऱ्या सर्व तरुण उमेदवारांना दुबई, उझबेकिस्थान, अरब अमिराती याठिकाणी नोकरी देण्यासंबंधी करार करण्यात आला. मार्च २०१९ मध्ये सर्व ११ तरुणांना टुरिस्ट व्हिसा देऊन दुबईत पाठवण्यात आले. त्यानंतर पुढील २० दिवसात टुरिस्ट व्हिसाची मुदत संपल्यामुळे सर्व तरुण दुबईतच अडकून पडले. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर तरुणांनी सेथील कुमारन यांच्याशी संपर्क केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर सेथील यांनी दुबई गाठून तेथे अडकलेल्या तरुणांचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च भागविला आणि एप्रिल २०१९ मध्ये त्यासर्वांना घेऊन ते भारतात परतले. भारतात आल्यानंतरही व्हीआरव्ही मेरीटाइम प्रा. लि  कंपनी कडून वारंवार त्या तरुणांना परदेशातील नोकरी मिळवून देण्याचे अमिष सुरूच होते. परंतु नोकरी आणि त्यासाठी भरलेले पैसे दोन्ही न मिळाल्यामुळे अखेर फेब्रुवारी २०२० रोजी कंपनी विरोधात नवी मुंबई येथील गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली. परदेशात नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून ११ तरुणांची फसवणूक केल्याबद्दल दोघांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News