चौथ्या टी -20 मध्ये विराट कोहलीने असे काही केले ज्याची कल्पना न्यूझीलंडला नव्हती

सकाळ (यिनबझ)
Friday, 31 January 2020

पाच सामन्यांच्या मालिकेत 3 - 0 अशी आघाडी घेणारी टीम इंडिया चौथ्या सामन्यातही जिंकण्याच्या उद्देशाने उतरली होती. न्यूझीलंडने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले

भारतीय क्रिकेट संघाने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध टी -20 मालिका जिंकली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत 3 - 0 अशी आघाडी घेणारी टीम इंडिया चौथ्या सामन्यातही जिंकण्याच्या उद्देशाने उतरली होती. न्यूझीलंडने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वरच्या फळीतील खेळाडू अपयशी ठरल्यानंतर भारताने मधल्या फळीच्या संघर्षानं 168 धावा जमविल्या.

न्यूझीलंडची खेळण्याची सुरुवातही फारशी चांगली नव्हती. मार्टिन गुप्टिल लवकर आऊट होता. यानंतर कॉलिन मनेरो क्रीजवर थांबला आणि हळू हळू पुढे जाऊ लागला. असे वाटले की मनरो सामना भारताच्या तावडीपासून दूर नेईल. पण त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि विराट कोहली यांनी मिळून असे काही केले की सर्वांनाच धक्का बसला.

वाह कोहली वाह!

न्यूझीलंडच्या संघाने केवळ 1 विकेट गमावत 11.3 षटकांत 95 धावा केल्या. खेळपट्टीवर सलामीवीर कॉलिन मॅनरो आणि यष्टीरक्षक टिम साइफर्ट होते. शिवम दुबेच्या ओव्हरचा चौथा चेंडू मनरोने कव्हरकरून खेळला. चेंडू खोलवर उभे असलेल्या शार्दुल ठाकूरच्या दिशेने गेला आणि त्यावर मनरो दोन धावा चोरण्याच्या विचारात होता.

 

शार्दुलने चेंडू उचलला आणि थेट नॉन-स्ट्रायकरच्या एंडवर स्टम्पच्या दिशेने फेकला. मात्र, कोहलीने हा चेंडू हवेत पकडला आणि स्ट्रायकर स्टम्पच्या दिशेने फेकला. शार्दुलला सरळ थ्रो गाठणे फार अवघड जाईल हे त्याला ठाऊक असल्याने मनरोने दुसऱ्या धावासाठी हळु सुरुवात केली. पण कोहली असं काहीतरी करेल हे त्याला ठाऊक नव्हतं. कोहलीने चेंडू फेकला आणि चेंडू थेट स्ट्रायकर एंडच्या विकेटवर गेला. या थेट हिटच्या जोरावर मनरो क्रीजवर पोहोचू शकला नाही. आणि विरोट कोहलीची शक्कल कामी आली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News