लीजंडस्‌ ऑफ चेसमध्ये सलग चौथा पराभव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 July 2020
  • विश्वनाथन आनंदला लीजंडस्‌ ऑफ चेसच्या चौथ्या फेरीतही पराभव पत्करावा लागला; पण अखेर आनंदला स्पर्धेतील पहिला गुण मिळवल्याचे समाधान लाभले.

मुंबई :- विश्वनाथन आनंदला लीजंडस्‌ ऑफ चेसच्या चौथ्या फेरीतही पराभव पत्करावा लागला; पण अखेर आनंदला स्पर्धेतील पहिला गुण मिळवल्याचे समाधान लाभले. आनंदने अनिश गिरीविरुद्धच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात चार डावानंतर बरोबरी ठेवली असल्यामुळे त्याला गुण मिळवता आला.

स्पर्धेच्या नियमानुसार चारही डावानंतर गुण समान असल्यास आर्मगेडॉन डाव खेळवण्यात येतो. यात जिंकणाऱ्यास दोन गुण; तर पराभूत खेळाडूस एक गुण दिला जातो. या डावात आनंदची बाजू खरे तर सरस वाटत होती, पण अनिश गिरीने आपण ऑनलाईन चाली जास्त जलद आणि सफाईदारपणे करू शकतो, हे दाखवून दिले. अखेर आनंदला खेळाची वेळेशी सांगड घालता आली नाही आणि तो पराजित झाला. अखेर त्याला या लढतीत २-३ पराभवास सामोरे जावे लागले.

आनंद - गिरी सामन्यातील निर्धारित चारही डाव बरोबरीत सुटले, तरी त्यांनी रसिकांचे लक्ष वेधले. पहिला डाव तब्बल ८२ चालींपर्यंत रंगला होता, तर दुसरा ४९ चालींपर्यंत. आता आनंदची लढत हंगेरीच्या पीटर लेकोविरुद्ध होईल. आनंद आता तळाला गेला आहे. पहिल्या तीन फेऱ्यात आनंदप्रमाणेच डिंग लिरेनने एकही लढत जिंकली नव्हती; पण लिरेनने लेकोला हरवले आणि आनंदला तळाच्या क्रमांकावर जावे लागले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News