आयएसएल स्पर्धेत चार परदेशी खेळाडूंना मैदानात उतरण्याची मुभा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

इंडियन सुपर लीगने (आयएसएल) या फ्रॅंचायझी आधारित स्पर्धेच्या सामन्यांमध्ये परदेशी खेळाडूंसाठी तीन अधिक एक या नियमांना मान्यता दिली. पाच विदेशी खेळाडूंच्या सध्याच्या नियमात बदल केल्यास स्थानिक खेळाडूंचे प्रतिनिधित्व वाढेल.

नवी दिल्ली : इंडियन सुपर लीगने (आयएसएल) या फ्रॅंचायझी आधारित स्पर्धेच्या सामन्यांमध्ये परदेशी खेळाडूंसाठी तीन अधिक एक या नियमांना मान्यता दिली. पाच विदेशी खेळाडूंच्या सध्याच्या नियमात बदल केल्यास स्थानिक खेळाडूंचे प्रतिनिधित्व वाढेल. 2021-22 मध्ये आयएसएलच्या आठव्या हंगामात हा नियम लागू होणार आहे. फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, त्या वेळी अध्यक्षा नीता अंबानीदेखील उपस्थित होत्या.

या निर्णयाची माहिती क्‍लब आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघासह (एआयएफएफ) च्या सर्व भागधारकांना देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, आयएसएल क्‍लब संघात जास्तीत जास्त सहा परदेशी खेळाडूंशी करार करू शकतील, एक मूलत: आशियाई खेळाडू घेणे बंधनकारक असणार आहे. सामन्यादरम्यान चार परदेशी खेळाडूंना मैदानात उतरण्याची मुभा देण्यात आली आहे. परदेशी खेळाडूंचा समावेश असलेल्या तीन अधिक एकचा नियम आशियाई फुटबॉल संघाच्या स्पर्धेच्या नियमांचा एक भाग असणार आहे. या अव्वल लीगमध्ये भारतीय खेळाडूंचे प्रतिनिधित्व वाढणे अपेक्षित आहे.

आयएसएल क्‍लबांना सध्या सात आंतरराष्ट्रीय खेळाडू करार करण्याची परवानगी आहे, त्यातील पाच खेळाडूंना मैदानात उतरवता येईल. आयएसएलला 2019 मध्ये एशियन फुटबॉल महासंघाने आणि फिफाने भारतातील अव्वल लीगचा दर्जा दिला होता. आयएसएल आता एएफसीच्या स्पर्धात्मक नियमांचा एक भाग आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News