‘या’ चार मोठ्या बँकांचे लवकरच होणार खासगीकरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020

कोरोनाच्या काळात सरकारच्या तिजोरीत पैशांची चणचण असल्याने तिजोरीत पुरेसा पैसा असावा यासाठी या बॅंकांचे समभाग विकून पैसा जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असे एका वरीष्ठ अधिका-याने रॉयटर्सशी बोलताना सांगितले.

‘या’ चार मोठ्या बँकांचे लवकरच होणार खासगीकरण

दिल्ली - केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील चार बॅंकांचे लवकरचं खासगी करण होईल, तशा हलचाली केंद्र सरकारकडून सुरू केल्या आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची यादी निश्चित केली आहे. यामध्ये पंजाब अॅण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युसीओ बँक आणि आयडीबीआय़ बँक इत्यादी बॅंकांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या बॅंकांमध्ये सरकारी मोठी गुंतवणूक आहे. पण सरकार आता समभागांची विक्री करण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या काळात सरकारच्या तिजोरीत पैशांची चणचण असल्याने तिजोरीत पुरेसा पैसा असावा यासाठी या बॅंकांचे समभाग विकून पैसा जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असे एका वरीष्ठ अधिका-याने रॉयटर्सशी बोलताना सांगितले.

पंतप्रधान कार्यालयाकडून त्याबाबत पत्र लिहिले असून ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी असं म्हटलं आहे. त्याचबरोबर सरकारी बॅंकांची स्थिती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने पाच बॅंकांमध्येचं गुंतवणूक करण्याचा सरकारचा निर्णय आहे. इतर बॅंकांचे खासगीकरण होणार आहे. या वर्षाअखेरपर्यंत खासगीकरण होण्याची शक्यता आहे.

२०१७ पासून बॅंकांच्या विलिनीकरणाला सुरूवात झाली आहे. महिला बॅंक आणि इतर पाच बॅंकांचं स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं. त्याचबरोबर सरकारने एलआयसीला आयडीबीआय बॅंकेतील ५० टक्के समभाग विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आयडीबीआय बॅंकचं एकप्रकारे खासगीकरण झालं आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला याच वर्षीच्या सुरुवातील ७५ हजार कोटींच्या थकीत कर्जासंदर्भातील चिंता व्यक्त करत याबद्दल निर्णय घेण्याची विनंती केली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News