किल्ले  चंदन वंदन म्हणजे जुळे भाऊच

यिनबझ टीम
Monday, 18 February 2019

कथा आणि कादंबऱ्यामध्ये जुळ्या भावाविषयी आपण नेहमीच वाचत आलोय आणि वाचत असतो. मात्र दुर्ग विश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात. त्याच्यापैकीच एक म्हणजे किल्ले चंदन-वंदन.

कथा आणि कादंबऱ्यामध्ये जुळ्या भावाविषयी आपण नेहमीच वाचत आलोय आणि वाचत असतो. मात्र दुर्ग विश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात. त्याच्यापैकीच एक म्हणजे किल्ले चंदन-वंदन. साताऱ्याच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. उसाच्या पिकामुळे हा सर्व परिसर सधन आहे. त्यामुळे रस्ते, वीज, एसटी या सर्व प्राथमिक सुविधा गावा-गावापर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे, पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच दर्शन देतात. इ.स ११९१ ते १९९२ सालच्या तामलेखानुसार ही दुर्गजोडी शिलाहार, राजा दुसरा भोज यांनी बांधली. १६५९च्या सुमारास शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अंजिक्यतारा या किल्ल्यासोबत या जोडीला देखील स्वराज्यात शामिल करून घेतले.

चंदनच्या प्रवेशदवराजवळील रस्ता पूर्वी बराच कठीण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रास्ता योग्यरित्या रुंद करण्यात आला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरुज आपणास प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात.

येथून साधारण १५ पायऱ्या चढून गेले असतात, डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडाचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास पाचवड म्हणतात. यातील दोनीही महादेवाच्या पिंडी या पाच लींगाच्या आहेत. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे, यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.  

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News