आमनेरचा किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 4 May 2020

गडगा नदीच्या काठावरून आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. या किल्ल्याला आमनेर हे नाव जवळ असलेल्या आमनेर गावावरून मिळाले आहे. हे आमनेर गाव ब्रिटिश आमदनीत उठून गेले.

वर्धा नदी, जाम नदी, वसिष्ठा नदी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हा आहे. आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा एक अपरिचित असा किल्ला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला आमरनेरचा किल्ला महाराष्ट्रातील विदर्भामध्ये मोडतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वायव्येला हा किल्ला आहे. अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये हा किल्ला आहे. 

गडगा नदीच्या काठावरून आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. या किल्ल्याला आमनेर हे नाव जवळ असलेल्या आमनेर गावावरून मिळाले आहे. हे आमनेर गाव ब्रिटिश आमदनीत उठून गेले. गाव उठून गेल्यामुळे त्या गावाची वाटही मोडून गेलेली आहे. गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चालेला बुरूज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. 

या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो. गडाच्या मध्यभागी मारूतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे. चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी कमी आहे. त्यातूनही जात असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत.

या किल्ल्यास ८ बुरूज असून त्यापैकी ७ शाबूत आहेत. नदीतील पाण्याच्या माराने एक बुरूज भग्न झाला आहे. काळ्या पाषाणात वितळविलेले शिसे ओतून याचा पाया मजबूत करण्यात आलेला आहे. हा किल्ला १२ व्या ते १३ व्या शतकापासून अस्तित्वात असावा. तीनही बाजूस पाणी आणि एका बाजूस खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे.

या किल्ल्यावर शिवाचे मंदिर आहे. यास सोमेश्वर म्हणतात. सन १७६९ साली या किल्ल्यावर पेशव्यांचा मुक्काम झाला होता असे इतिहासकार सांगतात. 

गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम केलेले दिसते. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपऱ्याला चार आणि मध्ये दोन दोन बुरूज मिळून किल्ल्याला एकंदरीत बारा बुरूज आहेत. तापी आणि गडगाच्या संगमाकडील बुरूजावरून नदीचे उत्तम दर्शन होते, या बुरूजाच्या आतील बांधकामामध्ये राहण्याची सोय केलेली दिसते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News