आज फॉर्म्युला वनची शर्यत रंगणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 5 July 2020

प्रेक्षकांविना होणाऱ्या तसेच कडेकोट नियमावलीचे कठोर पालन होणाऱ्या शर्यतीच्या पात्रता फेरीतील पहिल्या टप्प्यात लुईस हॅमिल्टनने वर्चस्व राखले. त्यामुळे सक्तीच्या ब्रेकनंतरही काहीही बदलले नसल्याचेच जणू अधोरेखित झाले.

स्पिलबर्ग : कोरोना महामारीचा सामना करीत सुरू झालेली फॉर्म्युला वनची सर्कस सुरळीतपणे सुरू होण्याचा ग्रीन सिग्नल पात्रता शर्यती सुरू होण्यापूर्वी मिळाला. पुनरागमनाच्या पहिल्या शर्यतीपूर्वी झालेल्या कोरोना चाचणीत कोणीही पॉझिटिव्ह ठरले नाही. दरम्यान, लुईस हॅमिल्टनने ट्रॅकवर यंदाही आपलीच हुकुमत असणार, याचे संकेत सरावात दिले आहेत.

ऑस्ट्रियात होणाऱ्या पहिल्या शर्यतीसाठी 26 जून ते 2 जुलैदरम्यान 4 हजार 32 जणांची चाचणी झाली. त्यात कोणालाही कोरोनाची बाधा नसल्याचे आढळले. आता प्रत्येकाची पाच दिवसांनंतर नियमितपणे चाचणी होणार आहे. अर्थात रविवारी होणाऱ्या पहिल्या शर्यतीत कोणताही अडथळा नसेल, हे स्पष्ट झाले आहे.

प्रेक्षकांविना होणाऱ्या तसेच कडेकोट नियमावलीचे कठोर पालन होणाऱ्या शर्यतीच्या पात्रता फेरीतील पहिल्या टप्प्यात लुईस हॅमिल्टनने वर्चस्व राखले. त्यामुळे सक्तीच्या ब्रेकनंतरही काहीही बदलले नसल्याचेच जणू अधोरेखित झाले. सहा वेळचा सर्वांगीण विजेता हॅमिल्टन आणि त्याचा मर्सिडिस संघातील सहकारी वॅल्तेरी बोट्टास यांनी सरावाच्या पहिल्या सत्रात सर्वोत्तम वेळ दिली.

वर्णद्वेष संपलेल्या ब्लॅक मर्सिडिसमधील हॅमिल्टनच्या हेल्मेटवर ब्लॅक लाईव्ज मॅटर हा संदेश लिहिला होता. त्याने 1 मिनीट 4.816 सेकंद वेळ दिली. त्याने त्यानंतर ही कामगिरी 1 मिनीट 4.304 सेकंद अशी उंचावली. पहिल्या शर्यतीनंतर बोट्टास 0.356 सेकंदाने मागे पडला होता; पण त्याने दुसऱ्या सरावात हा फरक 0.197 सेकंद इतका कमी केला. हॅमिल्टनने कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले; पण त्याच वेळी या कामगिरीवरून निष्कर्ष काढू नका, असेही सांगितले. दरम्यान, मर्सिडिसच्या कारमधील यंत्रणेबद्दल रेड बुलने तक्रार केली होती; पण ती फेटाळण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News