माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांवर साधला निशाणा; पहा काय म्हणाले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020
  • राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी ट्विटर वर जीएसटीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती.
  • रोहित पवार यांच्या ट्विटनंतर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, 'रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही त्यांनी नीट अभ्यास करून बोलायला हवे!' असे प्रतिउत्तर दिले होते.

नगर :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी ट्विटर वर जीएसटीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. रोहित पवार यांच्या ट्विटनंतर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, 'रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही त्यांनी नीट अभ्यास करून बोलायला हवे!' असे प्रतिउत्तर दिले होते.  हे प्रकरण ताज असताना आता अजून एका भाजपच्या माजी मंत्र्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार यांच्या विधान सभा कार्यक्षेत्राखाली असणाऱ्या कर्जत जामखेड येथील, नव्याने तयार केलेल्या कोविड सेंटरची पाहणी करण्याकरीता माजी आमदार राम शिंदे त्याठिकाणी पोहोचले. कर्जत जामखेड येथील  कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. कर्जत जामखेड मध्ये कोरोनाने थैमान घातलं असताना, काही नॉलेज नसलेल्या व्यक्ती राजकीय दृष्टिकोनातून आरोग्य विभागाच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे आपण लोकांच्या जीवाशी खेळात आहोत याचा देखील त्यांना विसर पडला आहे अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी रोहित पवारांवर केली. 

राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केलेल्या टीकेला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पाश्वभुमी असल्याचे बोलले जाते आहे.  काही दिवसांपूर्वी जामखेडच्या वैद्यकीय अधीक्षकांची बदली नगरला करण्यात आली होती तसेच कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या होत्या. आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांना आमदार रोहित पवार हेच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप राम शिंदे यांनी केला. डॉक्टर आणि प्रशासन यांना त्यांचे काम करू द्यावे, आपण त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही असा सल्ला देखील शिंदे यांनी रोहित पवार यांना दिला. 

आमदार रोहित पवार हे २०१९ च्या विधान सभा निवडणूकीत परंपरागत भाजपचा गढ समजला जाणाऱ्या कर्जत जामखेड येथून मोठ्या मतांनी विधान सभेवर निवडून गेले आहेत. या निवडणुकीत रोहित पवारांनी भाजप सरकार मध्ये मंत्री असणाऱ्या राम शिंदे यांचा पराभव केला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News