आयसीसीचे माजी पंच बॅरी जर्मन यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी यष्टीरक्षक आणि आयसीसीचे माजी पंच बॅरी जर्मन (वय 84) यांचे निधन झाले.

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी यष्टीरक्षक आणि आयसीसीचे माजी पंच बॅरी जर्मन (वय 84) यांचे निधन झाले. जर्मन यांनी 1959 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते. ते ऑस्ट्रेलियाकडून एकूण 19 कसोटी सामने खेळले होते. त्यात त्यांनी दोन अर्धशतकांसह 400 धावा केल्या.

1959 मध्ये भारत दौऱ्यात बॅरी जर्मन यांनीऑस्ट्रेलियाकडून कानपूर येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. खेळाडू म्हणून कारकीर्द केल्यानंतर ते पंच झाले आणि 2001 पर्यंत त्यांनी 25 कसोटी आणि 28 एकदिवसीय सामन्यांमध्ये सामना पंच म्हणून आपले योगदान दिले. जर्मन यांनी 1998 साली धोकादायक खेळपट्टीमुळे जमैका येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघातील कसोटी सामना एका तासाच्या आत थांबवला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News