परदेशी मार्गदर्शकांना मिळणार ऑलिंपिकपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

टोकियोतील ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष लांबली आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने 11 खेळांसाठी नियुक्त केलेल्या 32 परदेशी मार्गदर्शकांना पुढील वर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नवी दिल्ली:  टोकियोतील ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष लांबली आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने 11 खेळांसाठी नियुक्त केलेल्या 32 परदेशी मार्गदर्शकांना पुढील वर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.टोकियो ऑलिंपिक एक वर्षाने लांबले आहे. त्यासाठी पूर्वतयारी करीत असलेल्या खेळाडूंच्या मार्गदर्शन पद्धतीत बदल होऊ नये, यासाठी सध्याच्या मार्गदर्शकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नवे मार्गदर्शक आल्यास त्यांना खेळाडूंना समजून घेण्यास तसेच खेळाडूंचा मार्गदर्शकांसह सूर जुळण्यास वेळ लागतो. सध्या हा आमच्याकडे नाही, असे रिजिजू यांनी सांगितले.

रिजिजू यांनी आता परदेशी तसेच भारतीय मार्गदर्शकांची नियुक्ती चार वर्षांसाठी असेल. अर्थात ऑलिंपिक ते ऑलिंपिक हा कालावधी असेल; मात्र प्रत्येक वर्षी कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. सध्याच्या मार्गदर्शकांना 2024 च्या ऑलिंपिकसाठी कायम ठेवण्याबाबतचा निर्णय टोकियोस्पर्धेनंतर होईल. मार्गदर्शकांची कामगिरी तसेच संबंधित क्रीडा महासंघाचे मत याबाबत महत्त्वाचे असेल, असे रिजिजू यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News