फोर्ब्स यादीत सात भारतीय- अमेरिकन व्यक्तींचा समावेश; वाचा! कशी घेतली उद्योगाने भरारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020

फोर्ब्स मासिकाने जगातील 400 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यात भारतीय- अमेरिकन सात उद्योगपतींचा समावेश आहे.

फोर्ब्स मासिकाने जगातील 400 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यात भारतीय- अमेरिकन सात उद्योगपतींचा समावेश आहे. ही भारतीय जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. सायबर सिक्युरिटी फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चौधरी, सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रोमश वाधवानी, ऑनलाईन होम गुड्स रिटेलर वाफेयरचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज शाह, सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटलचे संस्थापक विनोद खोसला, शेरपालो वेंचर्सचे मॅनेजिंग पार्टनर कविटार्क राम श्रीराम, एअरलाईनचे राकेश गंगवाल आणि वर्कडेचे सीईओ तथा सहसंस्थापक अनील भुसरी यांचा समावेश आहे.

फोर्ब्स यादीत 61 वर्षीय उद्योजक जय चौधरी यांचा क्रमांक 85 वा आहे . त्यांची संपत्ती 6. 9 अब्ज डॉलर्स असून त्यांनी 2008 मध्ये झेडस्केलेर नावाची कंपनी स्थापन केली. मार्च 2018 मध्ये ही कंपनी सार्वजनिक झाली. 1996 साली चौधरी आणि त्यांची पत्नी ज्योती चौधरी यांनी नोकरी सोडून सायबर सिक्युरिटी फर्म ही पहिली स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. 

73 वर्षीय वाधवानी यांचा क्रमांक 238 वा आहे. त्यांची संपत्ती 3. 4 अब्ज डॉलर्स इतकी आहे. सिंफोनी टेक्नॉलॉजी ग्रुपने वार्षिक उत्पन्न  2.5 अब्ज डॉलर्स इतके आहे. वाधवानी यांनी नऊ कंपन्यांना एकत्र करुन 2017 साली सिमफोनी ए1 नावाची नवी कंपनी स्थापन केली. एका छताखाली आता सर्व कारभार चालतो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी आणि कार्नेगी मेलॉन यांनी सीरियल अ‍ॅस्पेक्ट डेव्हलपमेंटची स्थापना केली, त्यांची आय टू टेकनॉलॉजी ही कंपनी 9. 3 अब्ज डॉलर्सला वाधवानी यांनी विकत घेतली. त्यानंतर रोमेश आणि त्यांचा भाऊ सुनील यांनी मुंबई विद्यापीठात वाधवानी इन्स्टिटय़ूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना 2018 मध्ये केली. ती 30 दशलक्ष डॉलर्सची आहे.

टॉप 5 उद्योगक

फोर्ब्स मासिकाने जगातील 400 श्रीमंत उद्योगतींची यादी जाहीर केली. त्यातील टॉप 5 उद्योजक पुढील प्रमाणे आहेत. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी प्रथम स्थान मिळवले. त्यांची संपत्ती 179 अब्ज डॉलर्स इतकी आहे. सलग तीन वर्षे ते प्रथम क्रमांकावर आहेत. बिल आणि मेलिन्डाचे सहसंस्थापक बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 111 अब्ज डॉलर्स इतकी आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 85 अब्ज डॉलर इतकी आहे. तर बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 73.5 अब्ज डॉलर्सची आहे. चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरचे अध्यक्ष तथा ओरॅकल गीन्ट सॉफ्टवेअरचे सह संस्थापक लॅरी एलिसन पाचव्या स्थानी आहे. त्यांची संपत्ती 72 अब्ज डॉलर्स आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News