फुटबॉल प्रीमियर लीग: 9 हजार सामन्यानंतर प्रथमच घडली घोडचूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 June 2020
  • गोलरेषेनजीकच्या सात कॅमेऱ्यांनी गोलरक्षकाची चूक टिपली नाही.

लंडन : कोरोनाच्या आक्रमणानंतर सुरू झालेल्या प्रीमियर लीगमधील खेळाडू प्रेक्षकांविना कसे खेळणार, याची चर्चा होती; पण प्रत्यक्षता पहिला दिवस गाजला तो गोल लाईन तंत्रज्ञानात गडबड झाल्यामुळे. चूक झाल्याची कबुली "हॉक-आय'ला देणे भाग पडले.

शेफिल्ड युनायटेडची फ्री किक रोखताना ऍस्टॉन व्हिलाचा गोलरक्षक ऑर्जन निलॅंड याने गोलरेषा पार केल्याची चूक टिपली गेली नाही. गोलरेषेनजीकच्या सात कॅमेऱ्यांनी गोलरक्षकाची चूक टिपली नाही. हे नऊ हजार सामन्यात प्रथमच घडल्याचे सांगत "हॉक-आय'ने चूक कबुल केली. ही लढत गोलशून्य बरोबरीत लुटली आणि शेफिल्ड युनायटेडच्या युरोपिय स्पर्धा पात्रतेच्या आशाही दुरावल्या.

खरे तर गोलचा आनंद शेफिल्ड युनायटेड खेळाडूंनी साजरा केला होता; पण रेफरींनी गोल दिला नाही. त्यांनी हॉक-आयने गोल झाल्याचे सांगितलेले नाही, असे सांगितले. आश्‍चर्य म्हणजे या वेळी व्हिडीओ असिस्टंट रेफरीची मदत घेण्यात आली नाही. दरम्यान, रहीम स्टर्लिंगने प्रीमियर लीगच्या पुनरागमनातील पहिला गोल केला. या गोलाच्या जोरावर मॅंचेस्टर सिटीने आर्सेनलचा 3-0 पाडाव केला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News