युवकाची ऑनलाईन फसवणुक; हजारो रुपयांचा घातला गंडा

आशिष ठाकरे
Tuesday, 4 June 2019
  • सोशल साईटवर ज्युपीटर क्लॅासीक ही दुचाकी विक्रीस असल्याचे सांगीतले
  • ही गाडी 26 हजार रुपयांमध्ये घेण्याचा सौदा ठरला.
  • पेटीएम व्दारे 20800, 11100, 11000, 100, 15000, 300, 13000 व 9000 असे एकूण  85500 रुपये जमा करावयास लावले.
  • चिखली येथील एका युवकाला 85,500 रुपयांचा गंडा

चिखली: आपल्याजवळील दुचाकीचा फोटो फेसबुक या सोशल माध्यमावर टाकून ती विकायची असल्याचे सांगत, वेळोवेळी पैशाची मागणी करीत, चिखली येथील एका युवकाला 85,500 रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघड झाली आहे. समाजमाध्यमांवर व्यवहार करतांना सावधानता बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

यासंदर्भात चिखली पोलीस स्टेशनला दिपक किशोर गोलाणी (वय 32) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 16 मे रोजी फेसबुक या सोशल साईटवर त्यांना ज्युपीटर क्लॅासीक ही दुचाकी विक्रीस असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी पोस्टकर्त्यास गाडीची सविस्तर माहिती व मोबाईल क्रमांक मागीतला. त्यांनी 9413208346 हा नंबर दिला व आपले नांव विलास पटेल असे सांगितले. ही गाडी 26 हजार रुपयांमध्ये घेण्याचा सौदा ठरला. गाडीची डिलीव्हरी घेण्यासाठी त्यांनी आपले आधारकार्ड व फोटो सदर नंबरवर पाठवले.

सदर नंबरवर गाडी मालकास त्याचे आयडी फ्रुफ मागीतले असता त्याने आधारकार्ड, आर्मी कँन्टीनचे स्मार्टकार्ड व इंडियन युनियन ड्राव्हींग लायसंन्य व आर्मीच्या गणवेशातील आपला फोटो पाठविला. त्यासोबतच 26 हजार रुपयांपैकी 20 टक्के रक्क्म 5,200 कुमार गौरव यांचे खाते क्रमाक 917891863152 या नंबरवर जमा करण्यास सांगितली. त्यांनी रक्कम सदर खात्यावर जमा केली. व इथेच त्यांची फसवणुक होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांने विविध कारणे सांगून व वेगवेगळे खाते क्रमांक देऊन पेटीएम व्दारे 20800, 11100, 11000, 100, 15000, 300, 13000 व 9000 असे एकूण  85500 रुपये जमा करावयास लावले. मात्र गाडी काही मिळाली नाही.

सदर प्रकरणात आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिपक गोलाणी यांनी 3 जुन रोजी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. यावरुन चिखली पोलीसांनी विकास पटेल रा. इंदौर, मध्यपदेश याच्याविरुध्द कलम 420 भांदवी चा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनामध्ये चिखली पोलीस करीत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News