चाहुल आठवणींची...

वैशाली साबदे
Tuesday, 3 September 2019

किती दिसाचा विरह तुझा
मज आता सोसवेना,
व्याकुळलेले मन हे बावरे 
कुणा कुणा उमजेना.

झेलले हळुवार तुला
अलगद दोन्ही हाताने,
अनमोल तुझे रूप मला
दिसले कैक दिवसाने.

किती दिसाचा विरह तुझा
मज आता सोसवेना,
व्याकुळलेले मन हे बावरे 
कुणा कुणा उमजेना.

तुझ्या स्पर्शाला आसुसलेली
मी कुणा सांगु ही प्रीत कशी,
अबोल आहे ही प्रीत आपुली
सागरासम अथांग खोली.

वाट पाहते नयन माझे
सख्या तुझ्या रे येण्याची,
आज अचानक लागे चाहुल
तुझ्या रे आगमनाची.

क्षणात गेली मरगळ सारी
आले करुनी सोळा शृंगार, 
पडला थेंब तुझा टपोरा
घेतला कवेत हळुवार.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News