पावसाळ्यात आजारला दूर ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

उन्हाळ्यातल्या उन्हाने हैराण झालेल्या लोकांना पावसाच्या आगमानाने दिलासा मिळत असला तरी ऋतू बदलामुळे अनेकदा आजाराला आमंत्रण मिळते. पावसाच्या पाण्यासह धूळ, कचरा वाहून आल्याने पाणी दूषित होऊन अनेक आजार उद्भवतात. जाणून घेवूयात पावसाळ्यात आजारला दूर ठेवण्यासंदर्भातील घ्यावयाची काळजी  

उन्हाळ्यातल्या उन्हाने हैराण झालेल्या लोकांना पावसाच्या आगमानाने दिलासा मिळत असला तरी ऋतू बदलामुळे अनेकदा आजाराला आमंत्रण मिळते. पावसाच्या पाण्यासह धूळ, कचरा वाहून आल्याने पाणी दूषित होऊन अनेक आजार उद्भवतात. जाणून घेवूयात पावसाळ्यात आजारला दूर ठेवण्यासंदर्भातील घ्यावयाची काळजी...  

पावसाळ्यातील आहारासंदर्भात घ्यावयाची काळजी

 १. किंचित आंबट-खारट, कडू, तुरट आणि तिखट आहार पावसाळ्यात सेवन करणे फायदेशीर ठरते. शक्यतो अधिक गोड खाणे टाळावे. 
२. कडधान्यामध्ये मूग आणि म्हसूर या धान्याला प्राधान्य द्यावे तर वाटाणा, चवळी, पावट्याचे सेवन टाळावे.
३. पचनास हलक्या आहाराचे सेवन करावे. 
 ४. दुध घेताना सुंट किंवा हळदीसह घ्यावे, पण दुधापासून बनवलेली मिठाईचे सेवन करणे टाळावे
५. फळामंध्ये सफरचंद, केळी, डाळींब यांचे सेवन करायला हरकत नाही. पण फणस खाणे टाळावे.

पावसाळ्यात घ्यावयाची विशेष काळजी
१. पावसाळ्यात अंघोळीसाठी शक्यतो कोमट किंवा गरम पाणी वापरावे.
२.ओलसर आणि दमट कपडे घालणे टाळावे.
३. सतत पाण्यात काम करणे टाळावे.
४. दिवसा अधिक झोपू नये तसेच रात्री जागरणही करु नये.
५. डास आणि माश्यांवर प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष्य द्यावे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News