भ्रूण व्यथा

सुप्रिया शिंदे
Tuesday, 22 September 2020

उदरात आई तुझ्या

मी स्वप्न पाहिले होते

दुःखात आसवे तुझी

मी ग पुसणार होते

भ्रूण व्यथा

 

सांग ना आई, बोलना

अशी कठोर का झालीस?

गर्भातच माझी अशी तू

का भ्रूणहत्या केलीस?

 

धरून तुझा पदर

मज चालायचे होते

अ, आ, इ गिरवित ग

आई बोलायचे होते

 

फुल होऊन जगात

मला फुलायचे होते

कुशीत आई तुझ्या

थोड खेळायचे होते

 

उदरात आई तुझ्या

मी स्वप्न पाहिले होते

दुःखात आसवे तुझी

मी ग पुसणार होते

 

सांग ना आई, बोलना

मी होते तुमचं बाळ

का मारलेस मला तू?

का ग कापलीस नाळ?

 

- सुप्रिया शिंदे

एमएससी - २, अॅनॅलिटिकल केमिस्ट्री, एच व्ही देसाई महाविद्यालय, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News