आयुष्य हे क्षणभंगुर

वृषाली भणभणे
Tuesday, 15 September 2020

आयुष्यात चांगली नाती आणि मित्र मैत्रिणी असणं खूप गरजेच आहे. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण ताण तणाव हलके करतात.

आयुष्य हे क्षणभंगुर

आयुष्यातला प्रत्येक क्षण हा अतिशय मौल्यवान आहे. एका क्षणात काय घडेल ते सांगता येत नाही. म्हणून आयुष्य तुम्हाला आवडतं तसं जगा. बघायला गेल तर आयुष्य तितकंही अवघड नाही जगायला, त्यामुळे नेहमी हसत राहा कारण हसायला पैसे लागत नाही.

बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या महत्वाच्या स्टेज आहेत. यात जगलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या! कारण मृत्यू कुठल्याही क्षणी येईल. मृत्यू हा कोणालाच टळला नाही, हा निसर्ग नियमच आहे.

देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. स्वतःची तुलना दुसऱ्या सोबत करू नका. स्वताला आरश्यात पाहून, आहे तसे स्वीकारा. आरसा कधी खोट बोलत नाही. तुमच्यात काय खास आहे हे शोधा. देवाने त्याला इतकं चांगलं दिलं आणि मला नाही अस म्हणून देवाला दोष देऊन त्याचा अपमान करू नका. आयुष्यात तुम्हाला आवडतं ते करा. लोक काय म्हणतील हा विचार करून स्वतःच्या काम किंवा आवड यावर ब्रेक मारू नका.

आयुष्यात चांगली नाती आणि मित्र मैत्रिणी असणं खूप गरजेच आहे. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण ताण तणाव हलके करतात. हीच माणसे खचलेल्या वेळी आधार देतात. सकारात्मक लोकांशी नाते जोडा, तर त्रासदायक लोकांपासून लांब राहा. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत बोला, भेटावसं वाटल तर भेटा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला.

मनात कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप ठेवू नका. चुकलात तरी चूक होऊ द्या कारण चुका या देवाकडून पण होतात. चूक झाली तर ती सुधारा पण घाबरून जाऊ नका. नेहमी चांगली वृत्ती ठेवा. दुसऱ्यांना मदत करत राहा. मनमोकळेपणाने प्रेम करा व नाती जपा. एखाद्याने काही चांगल काम केलं तर त्याचं कौतुक करा आणि नाही आवडलं तर ते न दुखावता त्याला ते सांगा. मनामध्ये कोणासाठी द्वेष, राग ठेवू नका. जाती ,धर्म असा भेदभाव करू नका कारण या लोकांनी तयार केलेल्या गोष्टी आहेत. माणसाला फक्त माणुसकी हवी. 

मजेत आणि मनमुराद जगा, टेन्शन घेऊ नका. आयुष्य हे एकदाच भेटतं. आयुष्य फक्त काम करण्यासाठी नाही, त्याचा उपभोग घ्या. आवडतं तिथे फिरा, आवडत ते खा, आवडतं तस राहा, स्वतःची काळजी घ्या. आठवणीच्या क्षणांचा साठा तयार करा .आठवणी या हत्तीच्या पावलांच्या ठश्या सारख्या मनावर उमटतात ज्या कधी पुसल्या जात नाही.

भूतकाळाचा पश्चात्ताप आणि भविष्याची चिंता, करण्यापेक्षा वर्तमानात जगायला शिका कारण या क्षणामध्ये खरा आनंद आहे. माणूस जन्माला येताना हि मोकळ्या हाताने येतो आणि मरण आल्यावर हि मोकळ्या हाताने जातो, पण मागे बरच काही सोडून जातो. म्हणूनच म्हणतात

जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!

मस्त राहा, बिनधास्त जागा, काळजी घ्या....

- वृषाली भणभणे

एमएससी सूक्ष्मजीवशास्त्र - २, एच व्ही देसाई महाविद्यालय, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News