मनसेचा राजमुद्रेचा झेंडा चार वर्षांआधीच रजिस्टर - राज ठाकरे

यिनबझ टीम
Friday, 14 February 2020

औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या, त्यावेळी पत्रकारांशी गप्पा मारताना राज ठाकरे यांनी उत्तर देताना मनसेच्या नव्या झेंड्याबद्दल खुलासा केला.

औरंगाबाद - औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या, त्यावेळी पत्रकारांशी गप्पा मारताना राज ठाकरे यांनी उत्तर देताना मनसेच्या नव्या झेंड्याबद्दल खुलासा केला. 

काही दिवसांपुर्वी मनसेने राजमुद्रा असलेला नवा झेंडा लाँच केला. त्यानंतर त्यावर अनेक राजकिय प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. यावरच पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मनसेचा राजमुद्रा असलेला नवा झेंडा हा मागील चार वर्षांआधी रजिस्टर करण्यात आला होता, आम्ही फक्त आता त्याचे ऑफिशिअल लॉंचिंग करण्यात आले आहे. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. 

मनसेच्या नव्या झेंड्यावर रेल्वे इंजिन नसल्याचे विचारले असता, हा झेंडा हिंदुत्वाचं प्रतीक आहे, मात्र निवडणुकीच्या वेळेला राजमुद्रा दिसणार नाही, तर रेल्वे इंजिनच दिसणार आहे. आम्ही फक्त झेंडा बदलला आहे, भुमिका मात्र तीच असणार आहे. यादरम्यान हिंदुत्वाला आणि औरंगाबादच्या नामकरणाला घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News