नागपूर विभाग: 90 टक्‍क्‍यांवर सव्वा टक्का विद्यार्थी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • नागपूर विभाग या वर्षी 18.70 टक्‍क्‍यांची घट
  • मागील वर्षी 90 टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 688 होती
  • या वर्षी ती दोन हजारांनी घटली असून, 1 हजार 385 विद्यार्थ्यांनी 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. 

नागपूर : नागपूर विभाग दहावीच्या निकालात या वर्षी 18.70 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत 90 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी 90 टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 688 होती. या वर्षी ती दोन हजारांनी घटली असून, 1 हजार 385 विद्यार्थ्यांनी 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. ही टक्केवारी निकालाच्या एकूण टक्केवारीत 1.27 टक्का एवढी आहे.
 
मागील वर्षी निकालात अडीच टक्‍क्‍यांची वाढ झाली होती. या वर्षी 18.70 टक्‍क्‍यांनी घट झाल्याने 45 ते 90 टक्‍क्‍यांवर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी 45 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 53 हजार 903 एवढी होती. ही टक्‍केवारी 35.56 एवढी होती. या वर्षी 40 हजार 208 (36.90 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.85 ते 90 टक्‍क्‍यांमध्ये 2 हजार 998 (2.75) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 45 टक्‍क्‍यांच्या खाली असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी घटली असून, 9 हजार 566 (8.78 टक्के) विद्यार्थी या गटात उत्तीर्ण झाले. मागील वर्षी ही संख्या 18 हजार 191 (12.00) एवढी होती. 

उत्तीर्णांची टक्केवारी अशी 
90 टक्के पैक्षा अधिक - 1,385 - 1.27 टक्का 
85 ते 90 - 2,998 - 2.75 टक्के 
80 ते 85 - 5,218 - 4.79 टक्के 
75 ते 80 - 7, 682 - 7.05 टक्के 
70 ते 75 - 7,682 - 7.05 टक्के 
65 तर 70 - 13, 540 - 12.42 टक्के 
60 ते 65- 17, 860 - 16.39 टक्के 
45 ते 60 - 40, 208 - 36.90 टक्के 
45 टक्के पैक्षा कमी - 9,566 - 8.78 टक्के 

एकूण उत्तीर्ण - 1,08,977 - 100.00

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News