मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात कॉंग्रेस कमी पडले; नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 5 May 2020

नोटबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी करताना पंतप्रधानांनी कोणालाही न विचारता सल्ला न घेता मनमानीपणे निर्णय घेतला. मागील ५ वर्षात केंद्रसरकार आर्थिक आघाडीवर पुर्णपणे ढासळलं आहे. पण अपयश जनतेला दाखवण्यात कॉंग्रेस पक्ष कमी पडला. 

मुंबई - मोदी सरकरच्या ५ वर्षात झालेल्या आर्थिक चुका दाखवण्यात कॉंग्रेस सरकार कमी पडल्याचे नुकतेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. चव्हाण हे एका वृत्तपत्राच्या सोशल मीडियाला मुलाखत देत असताना म्हणाले. 

नोटाबंदी, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी केल्यानंतर मोदी सरकार आर्थिक अडचणीत आले होते. केंद्र सरकारचे हे अपयश दाखवण्यात कॉंग्रेस कमी पडले. तसेच त्यांच्याविरोधात जनमत तयार करण्यास सुध्दा कॉंग्रेस सरकार कमी पडल्याचे चव्हाण यांनी मुलाखतीत सांगितले. 

नोटबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी करताना पंतप्रधानांनी कोणालाही न विचारता सल्ला न घेता मनमानीपणे निर्णय घेतला. मागील ५ वर्षात केंद्रसरकार आर्थिक आघाडीवर पुर्णपणे ढासळलं आहे. पण अपयश जनतेला दाखवण्यात कॉंग्रेस पक्ष कमी पडला. 

संसदेत जरी कॉंग्रेसची संख्या कमी असली, तरी हिंदीतून आक्रमक भाषणे देऊन जनतेपर्यंत आम्ही पोहचलो असतो तर त्याचे परिणाम नंतर झालेल्या निवडणुकांवर नक्कीच पडले असते. तसेच ही भाषणे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली असती. तर नक्कीच परिणाम जाणवले असते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News