शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीतून 'फिटनेस' महत्त्वाचा

धनंजय सोनवणे
Wednesday, 8 January 2020

रोज सकाळी चालणे व इतर व्यायामांमुळे दिवसभरासाठी नवी ऊर्जा व उत्साह मिळतो. तसेच विविध व्याधी दूर राहातात. हलके व्यायाम, योगासने, हस्ययोगामुळे विविध प्रकारची दुखणे बाजूला राहतात. दिवसभर ताजेतवाने राहून काम करता येते. 

साक्री : धकाधकीच्या दैनंदिन वाटचालीत आपला ‘फिटनेस’ चांगला राहावा म्हणून अनेक जण नियमित व्यायाम, हास्य व योगसाधनेवर भर देतात. त्यात येथील मॉर्निंग ग्रुपचा समावेश होतो. रोज भल्या सकाळी आठ ते नऊ किलोमीटर चालणे, व्यायामातून ग्रुपचे सदस्य दिवसभरासाठी आनंदी राहण्याची ऊर्जा कमावतात. 

मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले सांगतात, की आम्ही रोज सकाळी साडेपाचच्या सुमारास घराबाहेर पडतो. आदल्या दिवशी कितीही थकलो असलो तरी सकाळी मात्र नियमित फिरायला बाहेर पडतो. ग्रुपचे १५ ते १६ सदस्य नियमितपणे येतात. कारखाना फाटा परिसरापर्यंत सरासरी आठ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर चालतो. हलके व्यायाम, योगासने, हस्ययोगाही करतो. त्यामुळे विविध प्रकारची दुखणे बाजूला राहतात. दिवसभर ताजेतवाने राहून काम करता येते. 

नवी ऊर्जा व उत्साह टिकून राहातो. मॉर्निंग ग्रुपमध्ये पत्रकार, शिक्षक, व्यावसायिक, व्यापारी, निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महिन्यातून गेटटुगेदर ग्रुपचे सदस्य एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. मदत करतात. महिन्यातून एकदा सदस्यांचे गेटटुगेदर होते. एकत्रित जेवण, गप्पागोष्टी केल्या जातात. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत सोयीच्या वेळी सर्व सदस्य एकत्रित प्रेक्षणीय स्थळी जातात.ग्रुपमध्ये श्री. भोसले, प्रदीप कोळपकर, अली एस. जी. साक्रीवाला, तुलसीदास पांडे, दिलीप विसपुते, शशिकांत भोसले, मनोहर गुंजाळ, बापू भोई, आर. पी. भामरे, आर. आर. साळुंके, वाल्मीक वकारे आदी सदस्य आहेत.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News