"या" तारखेला होणार मुंबई आयआयटीचा पहिला व्हर्च्युल दीक्षांत समारंभ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020
  • आयआयटीचा  दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी एखाद्या सोहळ्या पेक्षा कमी नसतो.
  • विद्यार्थी अनेक दिवसांपासून त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग ठरणाऱ्या दीक्षांत सोहोळ्याची वाट पाहत असतात.
  • मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा पहिल्यांदाच मुंबई आयआयटीचा दीक्षांत समारंभ हा व्हर्च्युल रिऍलिटी द्वारे पारपडणार आहे.

मुंबई :-  आयआयटीचा  दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी एखाद्या सोहळ्या पेक्षा कमी नसतो. विद्यार्थी अनेक दिवसांपासून त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग ठरणाऱ्या दीक्षांत सोहोळ्याची वाट पाहत असतात. मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा पहिल्यांदाच मुंबई आयआयटीचा दीक्षांत समारंभ हा व्हर्च्युल रिऍलिटी द्वारे पारपडणार आहे. मुंबई आयआयटीच्या दीक्षांत सोहळ्याची रूप रेखा ही दरवर्षी प्रमाणे पारंपरिकच असणार आहे. मुंबई आयआयटीचा यावर्षी ५८वा दीक्षांत सोहळा असून या कार्यक्रमाला २०१६ रोजी नोबल पुरस्काराने सन्मानित झालेले प्राध्यापक डुलकान हॅलडने आणि ब्लॅकस्टोनचे चेअरमन  स्टिफन स्क्वारजमन हे दोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत सोहळ्याला प्रत्यक्षात उपस्तिथ राहिल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये आणि आयआयटी बॉम्बे मधून डिग्री मिळवण्याचा आनंद देखील विद्यार्थ्यांना मिळावा याकरीता यावर्षीचा दीक्षांत समारंभ हा व्हर्च्युल रिऍलिटी द्वारे पारपडणार आहे. 

हा कार्यक्रम मुंबई आयआयटीच्या फेसबुक पेज तसेच यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवला जाणार आहे. तसेच ह्या समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण हे डीडी सह्याद्रीवर देखील दाखवला जाणार असून ह्याद्वारे आपल्या कुटुंबाला, मित्र मैत्रिणींना इंटरनेट सुविधा नसताना देखील हा दीक्षांत समारंभ पाहता येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्या ५८व्या दीक्षांत सोहळ्याची सुरुवात ही पारंपरिक पद्धतीने होईल. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आणि आयआयटी मुंबईचे डिरेक्टर यांचे भाषण  होईल. विद्यार्थ्यांना त्यांचे मेडल्स, अवॉर्ड आणि डिग्री मिळताना आपले व्हर्च्युल रूप दिसणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना डिग्री प्रदान करत असताना विद्यार्थ्यांचे फोटो आणि नाव स्क्रीनवर दाखवले जातील. परंपरेप्रमाणे दीक्षांत समारंभाच्या शेवटी सर्व विद्यार्थी एकत्रितपणे प्रतिज्ञा घेऊन हा दीक्षांत सोहळा संपन्न होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News