आधी वंदू गणरायाला

अक्षया येलगे
Saturday, 22 August 2020
  • गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक महत्वपूर्ण उत्सव आहे.
  • संपूर्ण भारतात हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.
  • गणरायाचे आगमन आपण नाचत गाजत करतो.

गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक महत्वपूर्ण उत्सव आहे. संपूर्ण भारतात हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. गणरायाचे आगमन आपण नाचत गाजत करतो. सर्व घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळात सजावट करतात आणि या गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु होते. आरतीच्या सुरांनी संपूर्ण घर आणि परिसर आनंदीत होतो. गणरायाचे आवडते मोदक हे बालकांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वच आनंदाने खात असतात.

यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे परंतु आपला उत्सव थांबला नाही. "गणराया" या संकटातून आता तूच आम्हाला वाचव अशी प्रार्थना करत सर्वांनी छोट्या स्वरूपात का होईना मूर्ती पूजन केले. सोशल डिस्टंसिंगच भान राखत आरत्या पुन्हा प्रत्येक घरातून ऐकू येतील. सार्वजनिक मंडळांनी छोट्या मूर्तीसोबत आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय ही घेतला. भारतीयांसाठी चालत आलेली ही उत्सवाची परंपरा तरुणांनी एका वेगळ्या स्वरूपात परंतु तितक्याच जल्लोषात साजरी करत आहेत.

लेखाच्या शेवटाला हे गणपती बाप्पा, सुखकर्ता दुःखहर्ता खऱ्या अर्थाने आमचे हे दुःख दूर कर आणि आम्हा सर्वांना निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News