आधी दुष्काळाशी दोन हात, लग्नाचे नंतर बघू

शिवचरण वावळे
Monday, 10 June 2019

लग्नाचे निमंत्रण मेसेज, फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून नंदू तांड्यावरील तलाव गाळमुक्त करण्यासाठी २१ हजारांची मदत केली

नांदेडः भारतीय संस्कृतीत वधुपिता म्हटले की नेहमीच मुलीकडच्यांच्या मनात नसताना सुद्धा वराकडील मंडळीना नको ती उठाठेव करावीच लागते. त्यामुळे खर्चाला कितीही आवर घातला तरी, वधुपित्यास अनाठायी खर्चास सामोरे जावे लागते. परंतु, बंडेवार कुटुंबीयांनी लग्नपत्रिका न काढता व वराकडील मंडळी नाराज होणार नाही. याची सर्वती खबरदारी घेत नातेवाईक व मित्रपरिवारास लग्नाचे निमंत्रण मेसेज, फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून नंदू तांड्यावरील तलाव गाळमुक्त करण्यासाठी २१ हजारांची मदत केली आहे. 

मागील काही दिवसांपासून सूर्योदय फाउंडेशन व ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अती दुष्काळग्रस्त भागात पाणलोट विकास कामे सुरू आहेत. याची बंडेवार कुटुंबीयांना कल्पना होती. शिवाय वधूचे पिता सुधाकर बंडेवार सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. या वर्षीच्या तीव्र दुष्काळ परिस्थितीची त्यांना जाण आहे. त्यांच्या मुलीचे सोमवारी (ता. दहा) जूनला लग्न ठरले आहे.

मुलीच्या लग्नात अनाठायी गोष्टींवर होणारा खर्च कमी करता येईल का आणि तेच पैसे निधी म्हणून दुष्काळग्रस्त गावात होणाऱ्या जलसंधारणाच्या कामासाठी देता येईल का, याविषयी घरात सर्वांची चर्चा झाली आणि शेवटी लग्नपत्रिकेचा खर्च टाळून ती रक्कम तहानलेल्या गावात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामासाठी देण्याचे ठरले. श्री. सुधाकर यांनी ग्रामविकास विभाग समिती प्रमुख व संयोजक दीपक मोरताळे, तिरंगा परिवाराचे मिर्झा बेग, दुष्काळ विमोचन समितीचे ॲड. उदय संगरेड्डीकर आणि बाबूराव केंद्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी कल्पना बोलून दाखविली आणि लगेचच त्यांच्याकडे २१ हजारांचा धनादेश सोपविला. 

तलावाच्या खोलीकरणाचे काम युद्धपातळीवर 
नंदूतांडा येथे जुना तलाव आहे. या तलावाची पाण्याची साठवण क्षमता दोन कोटी लिटर इतकी आहे. परंतु, पाण्याची गळती होत असल्याने साठवण होत नाही. गाळाने भरल्या तलावाचे खोलीकरण केल्यास गावाला पाणीची कमतरता पडणार नाही म्हणून सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून तलावाच्या गाळ उपशासाठी जेसीबी मशीन उपलब्ध करून दिली. नांदेड जिल्हा माहेश्वरी महिला संघटना यांनी डिझेलचा अर्धा खर्च उचलला आहे; तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंडेवार कुटुंबीयांची २१ हजारांची मदत मिळाल्याने तलावाच्या खोलीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू अाहे. बंडेवार यांच्या कन्येच्या लग्नाच्या तारखेपर्यंत काम पूर्ण होईल.   

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News