अमरावतीच्या इतिहासात प्रथमच महिला पोलिस आयुक्त; विविध पुरस्काराने सन्मानित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 September 2020

डॉ. सिंग २००६ सालच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी पोलिस दलात केलेल्या उल्लेखणीय कार्याबद्दल भारत सरकारकडून गौरवण्यात आले. केंद्राकडून आंतरीक सुरक्षा पदक, राज्याकडून विशेष सुरक्षा पदक देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. सिंग कायदा आणि सुव्यस्था उत्तम राखण्यासाठी ओळखल्या जातात. राजकीय हस्तक्षेप झुंगारून त्यांनी कायद्याचे राज्य प्रस्तापीत केले.

अमरावती : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. खास पुरुषांसाठी समजले जाणारे विविध क्षेत्र महिलांनी पादाक्रांत केली. आणि पुरुषांपेक्षा काकणभर अधिक चांगले काम करुन दाखवले. त्यामुळे महिला अधिकारी म्हटल की, जनता आदर्शाने पाहते. त्यात आयपीएस अधिकारी डॉ. आरती सिंग यांचे नाव अग्रस्थानी आहे. अमरावती शहराच्या इतिहासात प्रथम एक महिला अधिकारी म्हणून डॉ. आरती सिंह यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे नगरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. 

डॉ. सिंग २००६ सालच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी पोलिस दलात केलेल्या उल्लेखणीय कार्याबद्दल भारत सरकारकडून गौरवण्यात आले. केंद्राकडून आंतरीक सुरक्षा पदक, राज्याकडून विशेष सुरक्षा पदक देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. सिंग कायदा आणि सुव्यस्था उत्तम राखण्यासाठी ओळखल्या जातात. राजकीय हस्तक्षेप झुंगारून त्यांनी कायद्याचे राज्य प्रस्तापीत केले. 'एमबीबीएस शिक्षण पुर्ण करुन एमडी करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना थेट जनतेचा संपर्क आला. त्यामुळे महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार याची जाणीव झाली. महिलांवरील हिंसा थांबवायची असेल तर कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी लागले, त्यासाठी पोलिस सेवा निवडले. विदर्भात गेली नऊ वर्षे काम केले त्यामुळे विदर्भातील भौगोलीक परिस्थितीची माहिती आहे. जनमानसात दिवसेंदिवस पोलिसांची प्रतिमा खालावत चाचली, ही  प्रतिमा सुधारण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला जाईल. अधिराऱ्यांची मिटींग घेऊन अमरावती शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. अवैद्य व्यवसायामुळे सामान्य नागरिकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे, अवैद्य व्यवसायांना आळा घालवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे' मत डॉ. सिंग यांनी व्यक्त केले.

आयपीएस अधिकारी चंद्रकीशोर मीना यांनी बदली अमरावती विशेष पोलिस महानिरीक्षक या पदावर करण्यात आली. २००६ सालच्या बॅचचे मीना हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या अतिदुर्गम गडचिरोली, गोंदीया, नांदेड जिह्यात सेवा बजावली. आर्थिक राजधारी मुंबईत कायद्याचे अधिराज्य निर्माण केले. त्यामुळे कडक शिस्तीचे पालन करणारे अधिकारी म्हणून ते राज्याला परिचीत आहे.  

'भ्रष्टाचाराचे पेव सर्वत्र फुटले आहे, कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, त्यासाठी कडक पावले उचलले जातील. येणाऱ्या काळात सर्वजनिक सन, उत्सव साजरे केले जाणार आहेत. जिह्यातील काही भाग अतिसंवेदनशील आहे,  त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा वेळी जनतेची मदत घेतली जाणार आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी महत्त्वाची भुमिका बजावली, भविष्यातही असेच काम केला जाईल' अशा विश्वास  विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी व्यक्त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News