फ्लाइंग कारची पहिली चाचणी यशस्वी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 September 2020

फ्लाइंग कारची पहिली चाचणी यशस्वी

सध्याच्या काळात काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कारण आपल्या वाचनात किंवा एखाद्या शास्त्रज्ज्ञाने केलेलं भाकीत खरं झालं आहे. आता आपल्याला काही दिवसात आकाशात विमानासारखी हवेत उडणारी कार दिसेल. पूर्वी आपण हे चित्रपटात पाहिलं आहे. परंतु हा नजारा आता प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. पण आता तुर्कीमध्ये याच फ्लाइंग कारची पहिली चाचणी पार पडली असून तुर्कीत तयार केलेल्या पहिल्या फ्लाइंग कारचं उड्डाण यशस्वी झालं आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ एबीसी न्यूजने पोस्ट केला आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ काही तासात ६० हजार लोकांनी पाहिला असून या यशस्वी झालेल्या गाडी संदर्भातली माहिती लवकरचं सार्वजनिक काही तासांमध्येच हा व्हिडिओ ६० हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. या गाडीसंदर्भातील इतर माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. अशी गाडी तयार करण्यासाठी जगातील अनेक तज्ज्ञांनी प्रयत्न केले परंतु तुर्कीतील तज्ज्ञांना यश मिळाले.

पहिल्या फ्लाइंग कारचं इस्तंबूलमध्ये पहिलं उड्डाण घेण्यात आलं. पहिल्या उड्डाणातचं त्यांना यश आलं असं कॅप्शन त्या व्हिडीओमध्ये देण्यात आलं आहे. व्हायरल झालेला तो व्हिडीओ फक्त दोन मिनिटांचा असून त्यामध्ये हवेत उडत असल्याचे दिसत आहे. याच्या आगोदर तयार करण्यात आलेल्या फ्लाईग कारला हेलिकॉप्टर्सप्रमाणे पाती लावण्यात आल्या होत्या. मात्र ही फ्लाइंग कार चार पंख्यांच्या मदतीने उड्डाण करताना व्हिडिओत दिसत आहे. या कारमध्ये दोन लोकांना बसण्यासाठी जागा सुध्दा आहे.

ही कार रिमोटवरुन कंट्रोल करता येते, गाडीचा वेग आणि उंची या रिमोटवरून नियंत्रण ठेवता येईल. भविष्यात या गाडीत सर्व उपकरणे वापरण्यात येतील. सद्या या गाडीला खाली उतरण्यासाठी खालच्या बाजुला स्टॅण्ड आहेत. गाडीला लाईट सुध्दा वापरण्यात आली आहे, त्यामुळं ही गाडी रात्री सुध्दा चालवता येणार आहे. ही गाडी बाजारात कधी उपलब्ध होईल यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नसतील तर हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News