भूमीलाच प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

या वर्षीचे तिचे असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘दुर्गावती’ चित्रपटात ती अक्षय कुमारसह काम करणार आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. बॉलीवूडमधील तिच्या अप्रतिम अभिनयकौशल्याने निर्माते तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात. २०१९ मध्ये ‘पती, पत्नी और वो’, ‘बाला’ आणि ‘सांड की आँख’सारखे तीन हिट चित्रपट बॉलीवूडला दिले.

त्यामुळे २०२० मध्ये ती कोणत्या चित्रपटात दिसून येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. २०२० मध्ये ती ‘दुर्गावती’, ‘तख्त’, ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ आणि आणखी एका चित्रपटात झळकणार आहे.

या वर्षीचे तिचे असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘दुर्गावती’ चित्रपटात ती अक्षय कुमारसह काम करणार आहे. तिचा ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर लवकरच ती ‘तख्त’ चित्रपटाचेही चित्रीकरण सुरू करणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News