बेयर ग्रिल्स आणि रजनीकांत यांचा पहिला फोटो शेअर

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Wednesday, 29 January 2020
  • अलीकडेच एक बातमी समोर आली होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत टीव्हीचा प्रसिद्ध शो मॅन वी वाइल्डमध्ये दिसणार आहे.

अलीकडेच एक बातमी समोर आली होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत टीव्हीचा प्रसिद्ध शो मॅन वी वाइल्डमध्ये दिसणार आहे. त्यानंतर रजनीकांत यांचे चाहते खूप उत्साही झाले होते. पीएम मोदी भागातील चित्रीकरण उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट पार्क येथे करण्यात आले असताना, रजनीकांत कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात या कार्यक्रमाचे शूटिंग करत आहेत.

आता या भागातील चित्रीकरणाचे पहिले चित्र समोर आले आहे. रजनीकांतने मंगळवारी 28 जानेवारी 2020 रोजी कर्नाटकच्या बांदीपूरच्या जंगलात या कार्यक्रमाच्या शूटींगचे शूट केले. फोटोत रजनीकांत ब्लॅक जॅकेटमध्ये, ब्लॅक कॅपमध्ये शेड्स असलेली पांढऱ्या दाढीमध्ये जोरदार रूबाबदार दिसत आहेत. हा फोटो पाहून चाहते नक्कीच 'मॅन वी वाइल्ड' या भागाची वाट पाहत असतील. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News