इतिहासात प्रथम ऑनलाईन क्रिडा पुरस्काराचे वितरण, पाहा कसा संपन्न झाला ऑनलाईन कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020

यंदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि क्रीडामंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त खेळाडू आपल्या शहरातील स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया केंद्रातून ऑनलाईन उपस्थित होते.

मुंबई : मेजर ध्यान चंद्र यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या थाटामाटात होणारा क्रीडा वितरण पुरस्कार कार्यक्रम यंदा स्थगीत करण्यात आला. आत ऑनलाईन पुरस्काराचे वितरण करण्याचा निर्णय क्रीडा विभागाने जाहीर केला. त्यामुळे प्रथमच क्रीडा इतिहासात ऑनलाइन पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रिडा दिवस या निमित्ताने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी राष्ट्रपती भवनात खेळाडूंना पारितोषिक वितरण केले जाते. यंदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि क्रीडामंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त खेळाडू आपल्या शहरातील स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया केंद्रातून ऑनलाईन उपस्थित होते. एकूण 74 जणांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला त्यापैकी 64 मानकरी सोहळ्याला उपस्थित होते.

 

राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार

यंदा पाच जणांना मानाचा सर्वोच्च राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यामध्ये क्रीडापटू रोहित शर्मा, पैलवान दिनेश फोगाट, टेनिसपटू मनिषा बन्ना, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅराऑलिपिक मरियाप्पन  थांगावेलू यांना गौरविण्यात आले. 

जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्कार 

तिरंदाजी धर्मेंद्र तिवारी, ॲथलेटिक्स पुरुषोत्तम राय, बॉक्सिंग रोमेश रठानिया, हॉकी कृष्ण कुमार हुड्डा, कबड्डी विजय भालचंद्र मुनिश्वर, टेनिस नरेश कुमार, कुस्ती ओमप्रकाश दहिया.

सर्वसामान्य  द्रोणाचार्य पुरस्कार 

हॉकीपटू जूड फेलिक्स, मल्लखांब योगेश मालवीय, नेमबाजी जयपाल राणा, वुशु कुलदीप कुमार हंडू, प्यारा बॅडमिंटन गौरव खन्ना 

अर्जुन पुरस्काराचे मानकरी 

तिरंदाजी रतानु दास, ॲथलेटिक्स दुती चंद, बॅडमिंटन चिराग शेट्टी, सात्विक साईराज रेंकीरेड्डी, बास्केटबॉल विशेष भृगुवंशी, बॉक्सिंग मनिष कौशिक, लवलीना बोरगोहेन, क्रिकेट ईशांत शर्मा, दिप्ती शर्मा, घोडेस्वारी अजय अनंत सावंत, फुटबॉल संदेश झिंगन गोल्फ आदिती अशोक, हॉकी आकाशदीप सिंह, दीपिका, कबड्डी दीपक, खो-खो सारिका सुधाकर काळे, रोईंग दत्तू बबन भोकानल, नेमबाजी मधु भाकर, सौरभ चौधरी,  टेबल टेनिस सुहास पाटकर, टेनिस दिविज शरण, लूस शिवा केशवन, कुस्ती दिव्या काकरान, राहुल आवारे, प्यारा जलतरणपटू- सुयश नारायण जाधव, पॅराअॅथलीट संदीप, पॅरा नेमबाज मनीष नरवाल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News