मच्छीमाऱ्यांची परिस्थिती जाणून घेणारा पहिला मंत्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 June 2020
  • मंत्री अस्लम शेखने घेतली मच्छीमारांची भेट

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी "निसर्ग' चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर भाटी, मढ व अन्य किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये जाऊन तेथील मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

मंगळवारी (ता. 2) रात्रीपासून मंत्री अस्लम शेख यांनी किनारपट्टी भागातील सर्व गावांमध्ये जाऊन मच्छीमारांची रात्री उशिरापर्यंत भेट घेत त्यांना निसर्ग वादळाच्या पार्श्‍वभूमीवर काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले. एवढ्या वर्षांमध्ये अनेक वादळं आली, पण एकही मंत्री आम्हाला कधी भेटायला आला नाही. हे पहिले मंत्री असे आहेत जे या कठीण काळात एका सामान्य माणसाप्रमाणे आम्हाला धीर देण्यासाठी आले, ही बाब येथील मच्छीमारांना या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आत्मविश्‍वास देणारी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया भाटी संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण कोळी यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत मंत्री अस्लम शेख गावकऱ्यांच्या गाठी-भेटी घेत होते. मच्छीमार बांधवांना धीर देणे, त्यांना सतर्क व सावध करण्यासाठी ते थेट मच्छीमारांच्या वस्तीत जाऊन त्यांची विचारपूस करत होते.

"एवढ्या वर्षांत अनेक वादळं आली, पण एकही मंत्री आम्हाला कधी भेटायला आला नाही. हे पहिले मंत्री असे आहेत, जे या कठीण काळात एका सामान्य माणसाप्रमाणे आम्हाला धीर देण्यासाठी आलेत.'
- लक्ष्मण कोळी, उपाध्यक्ष, भाटी संस्था.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News