डोळ्यात लपलेलं प्रेम

श्‍वेता बरकडे, सातारा 
Friday, 3 May 2019

डोळ्यात लपलेलं प्रेम दोघेही 
पहिल्यांदाच अनुभवत असतात 
बघताच दोघे दोघांना हृदयात वाजू लागते 

पहिलं प्रेम हे नकळतच होत असतं 
अचानक कोणीतरी आपलसं वाटू लागतं 
नजरेतील खाणाखूणा दोघांनाच कळत असतात 

डोळ्यात लपलेलं प्रेम दोघेही 
पहिल्यांदाच अनुभवत असतात 
बघताच दोघे दोघांना हृदयात वाजू लागते 

हृदयातील प्रेमाची घंटा सुध्दा दोघेही 
पहिल्यांदाच अनुभवत असतात 
प्रेम म्हणलं की ब्रेकअप तर होत असतात 

या प्रेमामधील विरह सुध्दा दोघेही 
पहिल्यांदाच अनुभवत असतात 
पहिल प्रेम हे शेवटी पहिल प्रेम असतं 

जे आयुष्यात आपल्याला खूप काही शिकवत असतं 
नंतर आयुष्यात किती तरी वेळा प्रेम होत असतं 
पण, हृदयात मात्र शेवटपर्यंत पहिलं प्रेम शिल्लक असतं 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News