‘साहो’ द गेम'चा फर्स्ट लूक रिलीज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

 ‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभास त्याच्या ‘साहो’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार असून, पहिल्यांदाच ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.

 मुंबई :  ‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभास त्याच्या ‘साहो’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार असून, पहिल्यांदाच ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलचा उत्साह कायम ठेवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचा गेम लाँच करण्याची नवीन संकल्पना काढली आहे. या गेमचे नाव ‘साहो द गेम’ असे आहे.

 

या गेममध्ये चित्रपटाप्रमाणेच बरेच ॲक्‍शन असणार आहे. या गेमची चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नुकतेच या गेमचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या शिवाय हा गेम जिंकणाऱ्या स्पर्धकाला ‘साहो’ चित्रपटाच्या टीमकडून गिफ्टस्‌ आणि चित्रपटाची तिकिटे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. हैदराबादमधील एका गेम सर्व्हिस कंपनीने हा गेम लाँच करण्याची जबाबदारी घेतली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News