किरकोळ दुखापत झाल्यास 'हे' प्रथमोपचार करा 

डॉ. अजित मापारी, क्रीडावैद्यक तज्ज्ञ
Monday, 25 March 2019

मैदानावर दुखापत किरकोळ स्वरूपाची किंवा मोठी, गंभीरही असू शकते. त्या दृष्टीने प्रथमोपचाराचे अगोदरच नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. गंभीर स्वरूपाच्या दुखापतीसाठी वैद्यकीय आणीबाणी उद्‌भवली तर त्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा, खेळाडूला गरज पडल्यास सुसज्ज हॉस्पिटल जवळपास उपलब्ध असावे. यासंबंधीची सर्व माहिती आधीच असणे आवश्‍यक आहे.

मैदानावर प्रथमोपचाराची पेटी सुसज्ज असावी.
सी. पी. आर.चे ट्रेनिंग घेतलेला, प्रथमोपचाराचे व्यवस्थित शिक्षण घेतलेला कमीत कमी एकतरी स्टाफ मेंबर मैदानावर उपस्थित असायलाच हवा. कोणत्या खेळ प्रकारात कोणकोणती दुखापत होण्याची संभावना असते, याचाही अंदाज प्रथमोपचारासाठी महत्त्वाचा असतो. डोक्‍याला लागलेला मार सोडून इतर दुखापती म्हणजेच हात-पाय मुरगळणे, मुका मार वगैरेंसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी -

RICER
  आर : रेस्ट (दुखावलेल्या भागाला आराम देणे), आय : आईस (बर्फाने शेकणे), सी:कॅंप्रिशन (क्रेप ब्रॅंडेज बांधणे, दाबून ठेवणे), इ : इलेव्हेशन (दुखावलेला भाग उंच ठेवणे), आर : रेफरल (पुढील उपचारासाठी पाठविणे)

  प्राथमिक तपासणी न करता, दुखापतीचा व्यवस्थित अंदाज न घेता घाईघाईने जखमी खेळाडूला मैदानाबाहेर घेऊन जाण्याची गडबड करू नये., खेळाडू जखमी किंवा अर्धवट शुद्ध हरपलेला असेल. पूर्ण बेशुद्ध झाला असेल तर त्याला तत्काळ उठून बसवणे किंवा पाणी पाजणे असे प्रकार करू नयेत. त्याबरोबरच एखादे शीतपेय, पातळ औषध वगैरे द्रवपदार्थ पाजण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, ते घातक ठरू शकते. अशा वेळी सुरक्षित आणि काळजीपूर्वक त्याला मैदानाबाहेर घेऊन जावे आणि पुढील वैद्यकीय मदत येईपर्यंत त्यावर लक्ष ठेवावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News