'या' दिवशी पहिली प्रवेश गुणवत्ता यादी होणार जाहीर, सविस्तर तपशील जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020
  • मुंबई विद्यापीठाचे फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख आज होती. अधिकृत अधिसूचनेनुसार मुंबई विद्यापीठाची पहिली पदवीपूर्व प्रवेश गुणवत्ता यादी या शैक्षणिक वर्षासाठी ०६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली :- मुंबई विद्यापीठाचे फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख आज होती. अधिकृत अधिसूचनेनुसार मुंबई विद्यापीठाची पहिली पदवीपूर्व प्रवेश गुणवत्ता यादी या शैक्षणिक वर्षासाठी ०६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तथापि, यापूर्वी पहिली गुणवत्ता यादी ०४ ऑगस्टला येणार होती, परंतु कोविड -१९ साथीच्या महामारीमुळे ऑनलाईनची तारीख आणखी ०५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. आता ०६ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख - ०५ ऑगस्ट
  • प्रथम गुणवत्ता यादी - ०६ ऑगस्ट
  • कागदपत्रांची पडताळणी, फी भरणे - ०६ ते ११ ऑगस्ट
  • दुसरी गुणवत्ता यादी - ११ ऑगस्ट
  • तिसरी गुणवत्ता यादी - १७ ऑगस्ट
  • कागदपत्रांची पडताळणी, फी भरणे - १८ ते २१ ऑगस्ट

इतर तपशील

फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट होती, जो विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता ५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला. आता उद्या प्रथम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. याशिवाय इतर माहितीसाठी विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची वेबसाइट तपासू शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News