कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने एक फेब्रुवारी रोजी दिल्ली गृहसचिवांना पत्र लिहून जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांचा समावेश असलेल्या जेएनयू देशद्रोह प्रकरणात मंजुरी देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याची विनंती केली होती.

नवी दिल्ली : जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि इतरांवर देशद्रोहाचा खटला चालविण्यासाठी दिल्ली सरकारने शुक्रवारी दिल्ली पोलिसांना परवानगी दिली. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करण्यासाठी बोलावलेल्या कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कॅम्पसमध्ये (जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या.

यानंतर कन्हैया कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. या घटनेनंतर दिल्ली पोलिस गुन्हे शाखेने दाखल केलेल्या १ हजार २०० पानांच्या आरोपपत्रात या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्य आणि सात काश्मिरी विद्यार्थ्यांसह इतर १० विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने एक फेब्रुवारी रोजी दिल्ली गृहसचिवांना पत्र लिहून जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांचा समावेश असलेल्या जेएनयू देशद्रोह प्रकरणात मंजुरी देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याची विनंती केली होती. यावर दिल्ली सरकारने आज  पोलिसांना या प्रकरणी कन्हैया कुमार आणि इतरांवर देशद्रोहाचा खटला चालविण्यासाठी 
दिल्ली सरकारने शुक्रवारी दिल्ली पोलिसांना परवानगी दिली

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News