५ विद्यार्थिनी दगावल्यामुळे संस्थाचालकांचे पाय आणखी खोलात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

विद्यार्थिनीच्या मृत्यूस मतीन भोसलेसह अन्य एक, असे दोघे जबाबदार असल्याचा आरोप साजीलाल बेलसरे यांनी तक्रारीतून केला

अमरावती : जिल्ह्यातील मंगरूळचव्हाळा येथील प्रश्‍नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी भारती साजीलाल बेलसरे हिच्या अंगावर पिलर कोसळून तिचा मृत्यू झाला. शनिवारी  ही घटना घडली.

घटनेनंतरही मृत विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी त्याबाबत आक्षेप घेतला होता. त्याप्रकरणी चिखलदरा तालुक्‍याच्या मोथा येथील साजीलाल श्‍यामलाल बेलसरे (वय ३४) यांच्या तक्रारीवरून मंगरूळचव्हाळा पोलिसांनी संस्थाध्यक्ष मतीन भोसले (वय ४०) यांच्यासह अन्य एक, अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

मुलींच्या वसतिगृहाच्या बाजूला स्नानगृहाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळे विद्यार्थिनीच्या अंगावर पिलर कोसळून ती गंभीर जखमी झाली. जखमी मुलीचा उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. 

विद्यार्थिनीच्या मृत्यूस मतीन भोसलेसह अन्य एक, असे दोघे जबाबदार असल्याचा आरोप साजीलाल बेलसरे यांनी तक्रारीतून केला, त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News