हजेरीसाठी 'या' विद्यापीठात पंचिंग बंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 March 2020

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंद करून हजेरीच्या नोंदी हजेरीपत्रकावर मॅन्युअली घ्याव्यात, असे पत्र विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे.

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रसार आता जगभर झाला असून, महाराष्ट्रातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचा प्रसार टाळण्याच्या निमित्ताने सर्वच शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी बंदचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या विचाराधीन आहे. तत्पूर्वी, विद्यापीठ अनुदान आयोग व शिक्षण संचालनालयाने सर्व विद्यापीठांमधील बायोमेट्रिक हजेरी अनिश्‍चित कालावधीसाठी बंद ठेवावी, असे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंद करून हजेरीच्या नोंदी हजेरीपत्रकावर मॅन्युअली घ्याव्यात, असे पत्र विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने 5 मार्चला, तर उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालकांनी 11 मार्चला विद्यापीठांना आदेश दिले आहेत.

तत्पूर्वी, राज्यातील सोलापूरसह अन्य काही महापालिकांसह अन्य शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये होणारे सार्वजनिक कार्यक्रमही पुढे ढकलावेत, गरज भासल्यास मास्कचा वापर करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News