हरवलेले नातेवाईक कसे शोधाल?

सुरज पाटील 
Tuesday, 29 January 2019

मुंबई : काही वेळा आपले हरवलेले नातावाईक शोधण्याला आपण अपयशी ठरतो, तर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनसुध्दा काही परिणामकारक  माहिती आपल्याला मिळत नसते. हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी राज्य तसेच देशभरात वेगवेगळ्या संस्थादेखील मोठ्य़ाप्रमाणात काम करत असतात. ज्या हरवलेल्या व्यक्ती संदर्भात वेगवेगळ्या सोशल माध्यमांचा वापर करून शोधण्याचा प्रयत्न करत असतात. जर आपले नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती हरविल्यास कसे शोधायचे? पाहुयात... 

 • तुमच्या संबंधीत व्यक्ती किंवा नातेवाईक हरवल्यास प्रथमत: तुम्हाला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी लागेल. त्यानंतर  तुमच्या आजूबाजूच्या हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी काम करणार्या संस्थांशी संपर्क करावा लागेल.
 • त्या संस्था संबंधीत व्यक्तीच्य़ा संदर्भातील योग्य माहिती घेऊन, पोलिसांच्या मदतीने शोध मोहिम सुरू करतील, त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे फेसबूक, व्हाट्सऍप, ट्वीटर, इत्यादी सोशल मीडियाच्या मदतीने त्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील.
 • हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी राज्यभरात काही सेवाभावी संस्था तसेच समतोल फाऊंडेशन, सावली फांऊडेशन, उडाण फांऊडेशन, स्माईल प्लस फांऊडेशन या प्रकारच्या संस्था काम करत आहे.
 • सावली फांऊडेशन
  सावली फांऊडेशन ही संस्था मागील चार वर्षे कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवणे त्याचबरोबर जे नागरिक काहीच संभाषण करू शकत नाहीत, किंवा ज्या सापडलेल्या नागरिकांना स्वत:चा पत्ता माहित नसल्यास त्यांना सेवाभावी संस्थांकडे सुपूर्त करणे, या प्रकारचे काम ही संस्था करत असते. 
   
  उडाण फाऊंडेशन 
  उडाण फाऊंडेशन ही संस्था गेली पाच वर्षे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी स्वातंत्र्यपणे काम करत आहेत. तसेच या संस्थेसाठी काम करणारी संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्याबद्दल सविस्तरपणे...

  • कोल्हापूर : २१६ महिला व १४२ पुरूष
  • पुणे जिल्हा  : ९३ महिला व १०७ पुरूष
  • अहमदनगर :  ४५ महिला व १२४ पुरूष तसेच इतर ठिकाणी देखील या संस्थेतील लोक काम करत असतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News