मुंबई विद्यापीठ: एफवाय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

मुंबई - बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचा गोंधळ लक्षात घेत एफवायच्या प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाने शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. आता एफवायची पहिली गुणवत्ता यादी चार दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. १३ जूनऐवजी १७ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल, असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

एफवायच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नाव नोंदणीच्या प्रक्रियेत सायंकाळी ७ पर्यंत एक लाख ९० हजार ४६० ऑनलाईन नाव नोंदणी केली होती; तर विविध अभ्यासक्रमांसाठी पाच लाख ५६ हजार ९८७  अर्ज नोंदवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी चॅटबोट, व्हिडीओ ट्युटोरिअल्स तसेच हेल्पलाईनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

वेळापत्रक

  • अर्ज विक्री - १५ जूनपर्यंत
  • नोंदणीची मुदत - १५ जूनपर्यंत 
  • प्रिंटआऊट देणे - ७ ते १५ जून
  • पहिली गुणवत्ता यादी - १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता
  • शुल्क भरण्याची प्रक्रिया - १८ ते २० जून
  • दुसरी गुणवत्ता यादी - २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता
  • शुल्क भरणे - २१ ते २४ जून 
  • तृतीय गुणवत्ता यादी - २४ जून
  • शुल्क भरणे - २५ ते २७ जून

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News